राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून …
Read More »उद्धव ठाकरे भलत्याच मुडमध्ये, दरेकरांशी मिश्किल संवाद, मुख्यमंत्री-अध्यक्ष भेट पत्रकार परिषदेनंतर नूरचा बदलला
नागपूरातील हिवाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कालपासून अधिवेशनात सहभागी झाले. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. मात्र आज उद्धव ठाकरे यांचा नूर काही केल्या औरच असल्याचे विधिमंडळाच्या परिसरात पाह्यला मिळाले. आज एकाच दिवशी राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांच्या निमित्ताने नाराजी …
Read More »विधानभवन वास्तूच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालयाची जमीन अधिग्रहित करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश
नागपूर येथील विधानमंडळ वास्तुच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालय, नागपूर मौजे सिताबर्डी येथील ९६७० चौ.मी. जागा विधानमंडळास उपलब्ध करुन देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी आज आपल्या दालनात बोलवलेल्या सर्व संबंधितांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. विधान भवन, नागपूर …
Read More »जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची सासऱ्यावरून एकमेकांना चिमटे राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना टोलेबाजी
राज्यातील विधानसभा निवडणूकीत अपेक्षा जास्त बहुमत मिळवित राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची रितसर निवडही करण्यात आली. या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या नार्वेकरांच्या अभिनंदन पर ठरावावर बोलताना सासऱ्याच्या मुद्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजी आणि काढलेले चिमटे चांगलेच रंगल्याचे पाह्यला …
Read More »सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधत विधानसभेतील पहिल्याच भाषणातून रोहित पाटील यांची एन्ट्री पहिल्याच भाषणातून विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष वेधून घेतले
विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच विजय मिळविलेले रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीनिमित्त सभागृहातील अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना रोहित पाटील यांनी सुरेख शब्दपेरणी करणी सत्ताधाऱ्यांबरोबर विधानसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या राहुल नार्वेकर यांचेही लक्ष वेधून घेतले. राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदन …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …
Read More »राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. …
Read More »उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, आमदार आणि संरक्षक म्हणून जबाबदारी… विधिमंडळाच्या शतकोत्तरी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत
शिवाजी महाराजांच्या या महान भूमीने शतकानुशतके आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे नेतृत्व केले आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठा स्वराज्याची तत्त्वे, त्याच्या प्रशासकीय चौकटीत विकेंद्रित राजनैतिकता, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांचा समावेश करून, जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्या वांद्र वर्सोवा कोस्टल रोडप्रकरणी आयोजित बैठकीत दिले निर्देश
वांद्रे – वर्सोवा कोस्टल रोडच्या कामामध्ये एक कनेक्टर गजधर बांध, सांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी येणार आहे. हा कनेक्टर जेथे उतरणार आहे तेथील पुलाच्या खालील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना नागरिकांना समस्या जाणवणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे वांद्रे क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात …
Read More »विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूबः अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
आज आठवड्याचा पहिला दिवस मात्र सोमवारी पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत अतिवृष्टी झाली. जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूकीबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात गेलेले अनेक आमदार मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसले खरे पर्यंत मुंबईच्या उपनगरातच अडकून …
Read More »