राज्यातील खाजगी सैनिकी शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सैनिकी शाळांच्या सुधारित धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या (३० सप्टेंबर रोजीच्या) बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पुढे बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये भरती व्हावेत व देशाची सेवा करावी …
Read More »केसरकर यांचे रामदास आठवले यांना आश्वासन, मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात फोनवरून चर्चा
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक …
Read More »दिपक केसरकर यांची घोषणा, शाळेत जाणाऱ्या शिक्षकांसाठीही ड्रेस कोड
येत्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. पुरुष शिक्षकांना शर्ट आणि पँट घालावी लागेल. त्यांच्या शर्टचा रंग फिकट आणि पॅन्टचा रंग गडद असावा. तसेच महिला शिक्षकांना साडी किंवा सलवार सूट घालावा लागेल. जीन्स आणि टी-शर्ट घालून शिक्षक शाळेत येऊ शकणार नाहीत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर …
Read More »विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’
विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. …
Read More »कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार
धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही …
Read More »वाढीव पदांवर २८३ शिक्षकांच्या समायोजनास राज्य सरकारची मान्यता
वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच …
Read More »विजय वडेट्टीवार यांच्या धमकावता…प्रश्नावर, मंत्री केसरकर म्हणाले, दोन महिन्यात… अहो तुमचे संकेतस्थळच बंद आहे
राज्यात शिक्षकांच्या रिक्त पदभरतीबाबत एका उमेदवाराने तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्या उमेदवाराला थेट धमकाविता आणि संकेतस्थळ तपासायला सांगता. तुमचे मंत्री म्हणून असलेले धमकीप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अहो तुमची वेबसाईट अजूनही बंद आहे जरा तपासून पहा मग उमेदवारांना धमकी द्या असा खोचक सल्ला विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?
जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी वाढता पाठिंबा पाहून पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. या प्रकरणावरून राजकिय वादंग पेटलेले असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात …
Read More »उत्कृष्ट परसबागा निर्मितीसाठी शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन विजेता शाळेस ५१ हजार रूपयांचे बक्षिस
शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्यात उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेंतर्गत देण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी आणि या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि …
Read More »राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा
सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ …
Read More »