Breaking News

त्या वृत्तावर साक्षी मलिक म्हणाल्या की, आम्ही अमित शाह यांना भेटलो अन्…. आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त निराधार त्या अफवा

महिला कुस्तीगीरांच्या लैगिंक शोषण केल्याच्या विरोधात कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह अन्य कुस्तीगीरांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी मध्यरात्री कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली होती. यानंतर सोमवारी ५ जून रोजी साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं माहिती वाऱ्यासारखी पसरली यावरून विविध तर्क-वितर्कांना उधाण आलेले असतानाच यावर आता साक्षी मलिकने खुलासा केला आहे.

दिल्ली भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतलं असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या म्हणाल्या की, कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकने माघार घेतली आहे. ती पुन्हा रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे असल्याचा दावा केला.

या ट्विटनंतर अनेक प्रसारमाध्यमांनी त्या ट्विटच्या आधारे वृत्त चालविण्यास सुरुवात केली. अखेर या आंदोलनातून माघार घेणार असल्याच्या वृत्तावर साक्षी मलिकने ट्वीट करत खुलासा केला आहे. तिने म्हटलं की, हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. न्यायासाठीच्या लढाईत आमच्यातील कोणी मागे हटले नाही आणि हटणारही नाही. आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल. कृपया चुकीचे वृत्त पसरवू नका.

https://twitter.com/SakshiMalik/status/1665645066105544705?s=20

तसेच साक्षी मलिक म्हणाल्या की, आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा त्यांना ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी केली. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच, मुलीने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही चुकीचं आहे, असेही साक्षी मलिक यांनी एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

बजरंग पुनियानेही ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. आंदोलनातून माघार घेत असल्याचे वृत्त अफवा आहे. आम्हाला नुकसान पोहचवण्यासाठी वृत्त पसरवलं जात आहे. आम्ही ना माघार घेतली आहे, ना आंदोलन मागे घेतलं आहे. महिला कुस्तीपटूने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही खोटे आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार, असा निर्धार बजरंग पुनियाने व्यक्त केला.

Check Also

रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना

दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *