Breaking News
samruddhi समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्गावर रील्स, फोटो काढण्यास मनाई, अन्यथा होणार कारवाई दौलताबादजवळ महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचे आढळून आले

समृद्धी महामार्गावर रील्स किंवा फोटो काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

गेल्या काही महिन्यांत समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. तसेच वाहने थांबवून अनेक तरुण-तरुणांकडून फोटो, रील्स काढण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

यामध्ये दौलताबादजवळ महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहने ही सुसाट वेगात असतात. अशातच रस्त्यावरून कुणी मध्येच आल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. काही वेळा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात होणे किंवा वाहनावर नियंत्रणावर मिळवणे कठीण होते. हीच बाब समोर येताच वाहतूक पोलिसांकडून उपरोक्त कार्यवाही केली जात आहे.

महामार्ग पोलिसांनी सांगितले की, ८० ते १२० किमीच्या वेगाने जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून वाहतुकीस अडथळा आणला जातो. असे केल्यास कलम 341 नुसार एक महिना तुरुंगवास किंवा ५०० रुपये दंड, तसेच कलम 283 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असे कृत्य केल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.

फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प

देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते इगतपुरीपर्यंत सुरू करण्यात आला आहे. तर सध्या इगतपुरीपासून ते मुंबईपर्यंतच्या टप्प्याचे काम सुरू आहे. येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महामार्ग की मृत्यूचा सापळा?

डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत सुमारे ४०० पेक्षा अधिक अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात जवळपास शेकडो जणांचा बळी गेला असून १५० हून अधिक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यातील सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर झाल्याचे समोर आले आहे. चालकांच्या निष्काळजीपणामुळे जून महिन्यापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

इंस्टाग्राम मध्ये व्हाट्सअप सारखेच फिचर!

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *