जगभरातील अनेक देशांच्या आणि राज्याच्या राज भाषांचे इंग्रजीत आणि इंग्रजीतून स्थानिक भाषेचा वापर करणाऱ्या तरूणाईला भाषेचे बंधन कधी आडवे आले नाही. मात्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरी भाषेला मात्र Microsoft , google या कंपन्यांच्या संकेतस्थळावर स्थान नव्हते. मात्र काश्मिरी भाषेत लिखाण, वाचण करणाऱ्या आणि काश्मिरी भाषेतील साहित्य आता या दोन्ही कंपन्यांकडून स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी सहा महिन्यात काश्मिरी भाषेच्या लिपीचा समावेश Microsoft , google या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची घोषणा या दोन्ही कंपन्यांनी नुकतीच केल्याने काश्मिरी भाषेतून लिखाण आणि चॅटही, भाषांतरीत लेखन साहित्य उपलब्ध सहज उपलब्ध होणार आहे.
भाषांतर करता यावे याकरिता google च्या भाषांतरीत यादीत प्रमुख भाषांचा समावेश करण्यात आला. इतकेच काय चीनची राष्ट्रभाषा असलेल्या मँडरिन, अरबी भाषा इतकेच काय इस्रायलच्या हिब्रु भाषेचे भाषांतर Google च्या भाषांतर सुविधेतून करता येते. मात्र भारतातील काश्मिरी भाषेच्या भाषांतर गुगल मार्फत करता येत नव्हते. यासंदर्भात गुगलने केलेल्या एका सर्व्हेक्षणात फक्त २०१३ मध्ये ५ टक्के लोकांकडून काश्मिरी भाषेत लिखाण करत असल्याची माहिती उघड आली. त्यानंतर या भाषेच्या भाषांतराची सुविधा गुगल ट्रान्सलेशन या अॅप आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले.
आगामी ६ महिन्यात काश्मिरी भाषेला गुगल भाषांतराच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच गुगलप्रमाणे मायक्रोसॉफ्टकडूनही या भाषेचा समावेश भाषांतरीत आणि त्यासंदर्भातील लिखणासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या दोन्ही कंपन्यानी जाहिर केले.
मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या मोठ्या बलाढ्य कंपन्यांकडून तंत्रज्ञान क्षेत्रातील शोध आणि भाषेचा प्रश्नावर तोडगा काढून भाषांतराची आणि त्या त्या भाषेत लिखाणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेक अभ्यासू आणि वाचकांना भाषांतरीत लेखन वाचकांना भाषेची मर्यादा राहिली नाही.