Breaking News
Jammu-kashmir-terrorist-arrest जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर : महिलेसह दोन दहशतवाद्यांना अटक जम्मू-काश्मिरात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला ४७ लाख रुपयेही मिळाले होते

जम्मू-काश्मीर च्या बांदीपोरा जिल्ह्यात राज्य पोलिसांनी सीआरपीएफ आणि आसाम रायफल्सच्या मदतीने एका महिलेसह २ दहशतवाद्यांना अटक केलीय. त्यांच्याकडून सुरक्षा दलांनी एके-४७ रायफल आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय.

यासंदर्भात अधिका-यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर च्या आरोपींपैकी एक पाकिस्तानी हँडलर मुश्ताक अहमद मीरच्या संपर्कात होता. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला ४७ लाख रुपयेही मिळाले होते. अहमद मीर १९९९ मध्ये पाकिस्तानला गेला होता. सुरक्षा दलांना २५ ऑगस्ट रोजी एका हायब्रीड दहशतवाद्याची माहिती मिळाली होती. यानंतर परिसरात चौकी करण्यात आली. या चौकीतून एका व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. या व्यक्तीकडून एक पिस्तूल, एक पिस्तुल मॅगझिन, ८ राउंड आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शफायत जुबेर असे आरोपीचे नाव आहे. जुबेरने चौकशीदरम्यान सांगितले की तो मुनिरा बेगम नावाच्या महिलेकडे शस्त्रे घेण्यासाठी जात होता. मुनिरा बेगम ही ठार झालेल्या दहशतवादी युसूफ चौपानची पत्नी आहे. त्यानंतर पोलिसांनी मुनिराकडून १ एके-४७ रायफल, ३ मॅगझिन, ९० गोळ्या आणि एक पेन पिस्तूल जप्त केले. चौकशीदरम्यान मुनिरा दोन वेळा पाकिस्तानात गेल्याचे समोर आले.

बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुबेरला ४७ लाख रुपये मिळाले होते. त्याशिवाय २००० मध्ये कोठीबाग येथे झालेल्या आयईडी स्फोटातही जुबेरचा हात होता. या स्फोटात १२ पोलिसांसह १४ जणांचा मृत्यू झाला होता. २००९ मध्ये लष्कराचे वाहन जाळल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे.

Check Also

रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना

दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *