Breaking News
ISRO shared first video of Pragyan rover प्रज्ञान रोव्हर

इस्रोने शेअर केला प्रज्ञान रोव्हरचा पहिला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर विक्रम लॅंडरच्या रॅम्पमधून बाहेर पडताना दिसत आहे

चांद्रयान-३ मिशन अंतर्गत विक्रम लँडरचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर दोन दिवसांनी इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर विक्रम लॅंडरच्या रॅम्पमधून बाहेर पडताना दिसत आहे.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे एकूण वस्तुमान १,७५२ किलोग्रॅम आहे. आणि त्यांच्यामध्ये ६ पेलोड्स आहेत. चंद्रावरील १ दिवस म्हणजे पृथ्वीवरील सुमारे १४ दिवस असतात. त्यासाठी हे डिझाइन केलेले आहेत. प्रज्ञान रोव्हर ज्या ठिकाणी उतरला ती जागा सपाट होती पण पुढे त्याच्या वाटेत एक छोटासा खड्डा होता.

प्रज्ञानच्या सेन्सर्सला खड्डा दिसताच त्याने लगेच मार्ग बदलला. पुढील १२ दिवस प्रज्ञान चंद्रावर अनेक शोध लावेल आणि त्या सर्वांची माहिती विक्रमच्या माध्यमातून इस्रोला पाठवेल. प्रज्ञान रोव्हर हे एक रोबोटिक वाहन आहे जे चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन त्याची छायाचित्रे पृथ्वीवर अभ्यासासाठी पाठवेल.चांद्रयान-३ च्या रोव्हरचे नाव प्रज्ञान या संस्कृत शब्दावरून ठेवण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘बुद्धीमान’ असा आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असलेले ६ चाकी रोबोटिक वाहन आहे. हे वैज्ञानिक अभ्यास, चंद्रावरील डेटा संकलन यासारख्या कार्ये एका लुनार-डे मध्ये पाठवेल.

या दरम्यान, ते चंद्राच्या पृष्ठभागावर एकूण ५०० मीटर अंतर चालेल. त्याचे वजन २७ किलो आहे. हे सौरऊर्जेद्वारे चालवले जात आहे, ज्याची क्षमता ५० वॅट्स आहे. ते फक्त लँडर ‘विक्रम’ शी संवाद साधू शकते. चांद्रयान मोहिमेचे आयुष्य एक चंद्र दिवस आहे. चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान १४ दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांचे काम करतील. यानंतर तेथे अंधार होईल. विक्रम आणि प्रज्ञान सूर्यप्रकाशातच काम करू शकत असल्याने १४ दिवसांनी ते निष्क्रिय होतील.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

पुरस्कार वापसीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे पंतप्रधानांना पत्र, जाणून घ्या काय लिहिले

नुकतेच ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला कुस्ती खेळात पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *