Breaking News

विना ड्रायव्हर ७० कि.मी धावलेल्या रेल्वे मालगाडीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश

आज सकाळी अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर एक मालगाडी कोणत्याही आवाजाच्या शिवाय सुफरफास्ट धावत असल्याची एक व्हिडिओ व्हायरल झाली. विशेष म्हणजे या मालगाडीला दोन इंजिन लावल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या रेल्वे मालगाडीला विना ड्रायव्हर धावत असल्याचा उल्लेख काही जणांनी या धावत्या रेल्वेचा उल्लेख करत पोस्ट केला. परंतु आजकाल कोणती गोष्ट खरी आणि कोणती खोटी याचा पत्ता व्हिडिओ पाहून लागत नाही. त्यामुळे अनेकांनी या व्हिडिओ पहात फक्त आनंद लुटल्याचे सोशल नेटवर्किंग साईट्सवर दिसून आले.

मात्र हा व्हिडीओ पाहताना सदरची रेल्वे मालगाडी कोठुन धावतेय आणि कुठपर्यंत धावणार याबाबत कोणालाच काही कळेना. त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्याशिवाय कोणालाच काही कळेना. तेव्हा रेल्वे मालगाडी ही जम्मू काश्मीरमधील कठूआ येथून ते पंजाब राज्यातील होशियारपूर हे ७० किलोमीटरचे अंतर सदरच्या रेल्वे मालगाडीने रेल्वे ड्रायव्हरच्या मदतीशिवायच पार केल्याचे दिसून आले.

यासंदर्भातील भारतीय रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता म्हणाले की, साधारण सकाळी ७.२५ वाजता जम्मू काश्मीरमधील कठूआ रेल्वे स्थानकातून ५३ वॅगन असलेली मालगाडी विना ड्रायव्हरच धावायला सुरु झाली. तर सकाळी ९ च्या दरम्यान ती पंजाबमधील होशियारपूर येथे पोहोचल्याचे दिसून आल्याची माहिती रेल्वेच्या ट्रॅफिक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *