Breaking News

लॅपटॉप बॅटरी दीर्घकालीन टिकण्यासाठी करा ‘हे’ उपाय लॅपटॉप ची बॅटरी काम करताना लवकर संपते तर वापर या टिप्स

आजकाल कार्यलायीन कर्मचारी ऑफिसमधील कामासाठी डेस्कटॉपच्या जागी लॅपटॉपचा वापर करत आहेत. अशातच ते बराच काळ लॅपटॉप वर घालवत असतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरीही दीर्घकाळ टिकणे गरजेचे असते. जर तुम्हीही बराच वेळा लॅपटॉपवर घालवत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असेल तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशा टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचा हे टेन्शन कमी होईल.

या टिप्स फॉलो केल्यावर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ राहील. यासाठी तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या सेटिंग्समध्ये थोडा बदल करावा लागेल. सशिवाय तुम्ही तुमच्या लॅपटॉप वापरण्याच्या सवयी बदलूनही त्याची बॅटरी लाईफ सुधरू शकता. जाणून घेऊया लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करावे लागेल.

लॅपटॉपची बॅटरी लवकर कंझ्यूम होण्यापासून वाचवा

जर तुम्हाला वाटत असेल की लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ टिकावी तर त्या लॅपटॉपची बॅटरी कंझ्यूम होण्यापासून वाचवा. बॅटरी वाचवण्यासाठी लॅपटॉपमध्ये पॉवर सेटिंग्सचा पर्याय असतो. येथून तुम्हाला समजेल की लॅपटॉपची बॅटरी कशापद्धतीने काम करत आहे. सोबतच हे ही जाणून घेऊ शकता की बॅटरी सेटिंग्सचे कोणकोणते पर्याय वापरून तुम्ही लॅपटॉपची बॅटरी लाईफ सुधारू शकता.

हायबरनेट मोड्सचा करा वापर

याशिवाय तुम्ही बॅटरी वाचवण्यासाठी हायबरनेट्स मोडचाही वापर करू शकता. जर तुम्हाला हायबरनेट्स मोडबद्ल माहीत नसेल तर जेव्हा तुमच्या लॅपटॉपची बॅटरी पूर्णपणे संपायला आली असेल तर बॅटरी पूर्ण संपण्याआधी लॅपटॉपचे हायबरनेट मोड स्विच करायचा असतो.

बॅकग्राऊंड अॅप्स करा क्लोज

इतकंच नव्हे जर तुम्हाला लॅपटॉपची बॅटरी वाचवायची असेल तर लॅपटॉपच्या बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले सर्व अॅप्स बंद करावेत. हे अॅप्स लॅपटॉपची बॅटरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. हे अॅप्स बंद केल्ययाने बॅटरीचा वापर कमी होईल आणि लॅपटॉप लवकर डिस्चार्ज होणार नाही.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *