Breaking News
चांद्रयान-३

चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ यांच्यात संपर्क भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) ट्विट करत याबाबत माहिती दिली.

चांद्रयान-३ सोमवारी चंद्राच्या अतिशय जवळ पोहचले असून लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधतेय.

अशातच चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ चे विक्रम लँडर यांच्या संपर्क झालाय. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) ट्विट करत याबाबत माहिती दिली.

इस्त्रोने सांगितले की, चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ लँडर मॉड्यूल ‘विक्रम’ यांच्यात यशस्वी द्विमार्गी संपर्क झाला आहे.

यापूर्वीचे इस्रोचे मिशन चांद्रयान-२ चे ऑर्बिटर अद्यापही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. इस्रोच्या चांद्रयान-२ चे २०१९ मध्ये यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून चांद्रयान-२ चे ऑर्बिटर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचं स्वागत केले आहे.

चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या लँडरसोबत संपर्क करत संदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्याने “स्वागत मित्रा” असे म्हंटले आहे.

या दोन्हींमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला आहे. आता बेंगळुरूमध्ये स्थित मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये (मॉक्स) विक्रम लँडर मॉड्यूलसोबत संपर्क साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

इस्रोने सोमवारी सकाळी चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागाची टिपलेले काही फोटो ट्विट केले. इस्रोने सांगितले की, विक्रम लँडरमध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा चंद्रावर सुरक्षित जागा शोधत आहे, जिथे सावधगिरीने विक्रम लँडर उतरवता येईल.

चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. सध्या चांद्रयान-३ चंद्रापासून २५ किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा घालत आहे.

चांद्रयान-३ हे अंतराळयान १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-३ यशस्वीरित्या अवकाशात झेपावले होते.

चांद्रयान-३ पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान-३ मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले आहेत.

आता चांद्रयान-३ मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी ६ वाजून ४ मिनीटांनी चंद्रावर उतरणार आहे.

Check Also

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *