Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, …पण आमच्या नात्यांमधला ओलावा कमी झाला नाही पवारांची बहिण एन.डी.पाटील यांच्या पत्नी

आम्ही वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये असलेला ओलावा यात कधीही फरक करत नाही. एन डी पाटील यांच्या पत्नी या पवारांच्या बहिण आहेत.मात्र तरीही एनडी पाटील अनेकदा पवारांच्या विरोधातही ते वैचारिक मतभेद होते. मात्र आमच्या नात्यांमधला ओलावा कधीही कमी झाला नाही. त्याच पद्धतीने अजित दादा आणि पवार साहेब यांच्यामधील नात्यांमधील ओलावा हा कुठेही कमी झालेला नाही. पक्षातील वैचारिक वागणं आम्ही नेहमीच एकमेकां विरोधात असणार आहे. आमचे विचार आणि दादांचे विचार यात फरक आहे.त्यात कुटुंबातील नात्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. दादा आणि पवार साहेबांच्या भेटीमुळे महाविकास आघाडी कुठलेही संभ्रम नाही आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य आपण ऐकलं असतं तर कदाचित आपण हा मला प्रश्न विचारला नसता असेही देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवाब मलिक हे नुकतेच जेलमधून बाहेर आलेले आहेत ते त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. मात्र ते तिकडे जातील असं वाटत नाही, कारण नवाब मलिकांवर आरोप कोणी केले मलिकांना जो त्रास झाला तो कुणामुळे झाला? हे त्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे नवाब मलिक हे त्याच व्यक्तींच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांच्या दोन्ही मुली या लढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या वेळी ही त्यांच्या मुली या लढत होत्या. त्यामुळे नवाब मलिक असा निर्णय घेतील असं वाटत नाही, असेही स्पष्ट केले.

आज राष्ट्रवादी कार्यालया मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. आर. आर. पाटील (आबा) यांची आज जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की आबाने जाऊन इतकी वर्ष झाली मात्र एक दिवस जात नाही की त्याची आठवण येत नाही. अतिशय कल्पक, मेहनती आणि प्रामाणिकपणे कर्तव्याला जागणारा संवेदनशील माणूस म्हणजे आबा. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणिय आहे. पक्षाच्या बांधणीमध्ये आबांचे मोठं योगदान आहे. आबांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची नाळ जुळणारा नेता म्हणून ओळख आहे. हेच कार्य आबांचा मुलगा रोहित पाटील पुढे नेत आहे.

यावर सविस्तर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आर. आर. पाटील यांना जाऊन इतकी वर्ष झाली मात्र एक दिवस जात नाही की त्याची आठवण येत नाही. पक्षासाठीही त्याचे योगदान मोठे आहे. ते मोठ्या भावा प्रमाणे मला होते. त्याच्या पश्च्यात आज सुमन वहिनी आज नेतृत्व करित आहे. रोहितकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे आबांचा वारसा ते पुढे चालवत आहे.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *