Breaking News
ncp leader chhagan bhujbal on his birthday छगन भुजबळ

छगन भुजबळांना धमकी देणाऱ्याला औरंगाबादेतून अटक अंबादास जगन्नाथ खैरे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात संशयीताच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक, २२ ऑगस्ट : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाच्या बाबत वक्तव्य केले होते याबाबत ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचा या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला होता त्याच अनुषंगाने एका अनोळखी इसमाने सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर मेसेज व व्हाट्सअप करुन शिवीगाळ गेली याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी संशयीता विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने ९४२२२२२०१२ या क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर टेक्स मेसेज केला त्यांनी सदरचा क्रमांक हा ब्लॉक केला असता परत वीस-पंचवीस मिनिटांनी त्यांना व्हाट्सअप वर कॉल करून शिवीगाळ केली याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास जगन्नाथ खैरे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात संशयीताच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे

पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *