Breaking News

जितेंद्र आव्हाड यांचे धर्मांतरावरून पोलिसांना आव्हानः ४०० सोडा ४ तरी दाखवा उगीच मुंब्र्याला बदनाम करू नका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे. संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव घेताच थुंकले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांचं नाव घेतल्यावरही थुंकले होते. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भ… वरुन सुरु होणारी शिवी देत मुंब्रा बंदचा इशारा दिला. तसेच गाझियाबादच्या आयपीएस अधिकाऱ्याने केलेल्या दाव्याला आव्हान देत ४०० सोडा ४ तरी धर्मांतर केलेले प्रकरण दाखविल्यास आमदाराकीचा राजीनामा देऊ असे खुले आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचलाक, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनी गाझियाबादच्या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलेलं खरं आहे ते महाराष्ट्राला सांगावं अन्यथा आम्ही १ जुलैला मुंब्रा बंद करु. आमचं हे बोलणं मस्करीत घेऊ नका असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
गाझियाबादच्या पोलिसांनी असा दावा केला आहे की ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मुंब्र्यातील ४०० मुलांचं धर्मांतर करण्यात आलं. हाच मुद्दा घेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की ४०० मुलांच्या धर्मांतराचा जो आरोप होतो आहे, त्यातली चार मुलं दाखवा ती मिळाली तर मी राजीनामा देईन, असं म्हणत शिवीगाळ केली.

महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्या दंगली शासन पुरस्कृत आहेत. गाझियाबादच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा या ठिकाणी ४०० मुलाचं धर्मांतर झाल्याचा दावा केला आहे. मुंब्र्याची ही बदनामी आहेच शिवाय हिंदू धर्मालाही बदनाम केलं जातं आहे. हिंदू धर्माची मुलं मूर्ख आहेत का धर्मांतर करायला? आयपीएस अधिकाऱ्याने पेपरवर संख्या दाखवावी. फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ही या मस्करी लावली आहे का? तुम्ही एका शहराला बदनाम करता आहात. या शहराची अर्थव्यवस्था धुळीस मिळवता आहात असंही आव्हाड म्हणाले.

हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण लोक आहेत? ४०० मुलांचं धर्मांतर केल्याचा दावा करत आहात. चार मुलं दाखवा, मी राजीनामा द्यायलाही तयार आहे अस आव्हानही गाझियाबादच्या पोलिसांना देताना त्यांचा तोल सुटला आहे आणि त्यांनी शिवीगाळ केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *