Breaking News

दिल्लीत औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव नवी दिल्ली नगरपालिकेच्या मंजूरीनंतर रितसर नामकरण

नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी २९ जून रोजी याबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये एनडीएमसीने औरंगजेब रोडचं नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असं केलं होतं. पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या रस्त्याचं नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर औरंगजेब रोडला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं.

आता इथल्या लेनचं नाव देखील बदललं आहे. औरंगजेब लेन मध्य दिल्लीत अब्दुल कलाम रोड आणि पृथ्वीराज रोडला जोडते. या लेनला पूर्वी औरंगजेब लेन असं नाव होतं. जे बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करावं याबाबत एक प्रस्ताव सदस्य समितीसमोर ठेवण्यात आला होता, ज्याला आज (२८ जून) मंजुरी देण्यात आली.

एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, लेनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली म्युनिसिपल अॅक्ट १९९४ च्या कलम २३१ च्या उप-कलम (१) च्या खंड अ संदर्भात मांडण्यात आला होता. त्यानंतर औरंगजेब लेनचं नामकरण डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करण्यास परिषदेने मान्यता दिली आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *