नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनाच्या शेवटच्या एक दिवस किंवा त्या आधी भर विधानसभेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक नंबर आणि दोन नंबर उपमुख्यमंत्री कोण असा सवाल करत दोन्ही उपमुख्यमंत्ऱ्यांचे लक्ष नसन्यावरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्याच ४८ तासही उलटत नाही तोच सध्या पुणे दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यांना जयंत पाटील हे एकटेच भेटल्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात चांगलीच रंगली. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, काल रात्री आणि आज सकाळी मी शरद पवार साहेब यांच्या घरी होतो. मी सुनिल भुसारा आम्ही लोक रात्री २ वाजेपर्यत होतो. जर गेलो असतो तर नक्कीच सांगेन त्यात काय विशेष असे स्पष्ट केले.
यावेळी प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आमचं तुमच्याकडे लक्ष आहे पण तुमचंच आमच्याकडे लक्ष नाहीये, असं म्हणत अजित पवार यांनी विधानसभेतच जयंत पाटलांना ऑफर दिली होती. त्यावर जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले, विधानसभेत बोलताना त्यांनी तसं म्हटलं असेल पण विधानसभेत असे टोले टोमणे मारले जातात, ते गमतीत घ्यायचं असतं.
जयंत पाटील यांनी पुण्यनगरीच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचंही वृत्त आहे. तसेच पुढच्या काही दिवसांत जयंत पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल, अशाही चर्चा आहेत. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या गटात जाण्यासंबंधीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आज माझी कुठलीही भेट झालेली नाही. माझी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाहीये. मी मुंबईत आहे. शरद पवार यांना काल भेटलो, आजही सकाळी भेटलो, इंडियाच्या रणनीतीवर आमची चर्चा होतीये. मी शरद पवार यांची साथ सोडणार, या बातम्यांनी माझी करमणूक होतेय. पण या बातम्या आता थांबवा, अशी विनंती प्रसारमाध्यमांना केली.
इंडियाची पुढची बैठक मुंबईत होतेय. त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. काल मी शरद पवार यांची भेट घेऊन त्यासंदर्भातच चर्चा केली. आजही सकाळी मी पवारसाहेबांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो. अल्लाउद्दीनच्या चिरागसारखं मी इथून थेट पुण्यात कसा पोहोचेन? असा सवाल करताना अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं. मी अमित शाह यांना आज भेटलेलो नाहीये. मी कुठेही जात नाहीये. पण जायचं असेल तर आपल्याला सांगून जाईन, असं सूचक वक्तव्यही त्यांनी जाताजाता केलं. त्यावरूनही विविध कयास लावले जातायेत.
जयंत पाटील भुलले, काही आमदारांसह मी दादांच्या गटाला पाठिंबा देणार, या सगळ्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाहीये. या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये होतायेत. दादांचा गट किंवा भाजपा या बातम्या पसरवतंय असं मी म्हणणार नाही, असं सांगताना जयंत पाटील यांनी दादा गट आणि भाजपाविषयी सॉफ्ट कॉर्नरही दाखवला.