दिल्लीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकीत निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बेकायदेशीर असून आरोप करत शरद पवार हे त्यांची मुलगी सुप्रिया सुळे हीच्या सल्ल्यानुसार पक्ष चालवित असल्याची टीका केली. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अतिशय खोचक पध्दतीने प्रत्युत्तर देताना म्हणाले, राज्यात सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार होत्या. त्यावेळी प्रफुल पटेल यांचा लोकसभा निवडणूकीत पराभूत झाले होते. तरीही त्यांना राज्यसभेवर पाठवून १० वर्षे केंद्रात नागरी उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी दिली. तसेच पीए.संगमा यांच्या कन्येलाही संधी दिल्याची आठवण प्रफुल पटेल यांना करून दिली.
तसेच शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच राज्यसभेवर पाठविला. पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. तसेच त्यांच्या सांगण्यानुसार नियुक्त्या केल्या. आज त्याच पक्षाला ते बेकायदेशीर म्हणत आहेत. इतकेच नव्हे तर माझ्या अध्यक्ष पदासाठीचा निवडीचा पहिला प्रस्ताव प्रफुल पटेल यांनीच मांडला त्यावर त्यांनी सहीही केली. असे असताना त्यांनी बेकायदेशीर म्हणणे चुकीचं असल्याचे मतही व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा पक्षाच्या बांधणीसाठी आज शनिवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सुरुवात केली. त्याची सुरुवात त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला येथून सुरुवात केली. शरद पवार यांची पहिली सभा येवला येथे होणार आहे. तसेच तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना वरील वक्तव्य केले.
प्रफुल्ल पटेल यांना आपण केंद्रात मंत्रिपद दिले. तीन वेळा खासदार केले. त्यानंतरही त्यांनी बंडखोरी केली. परंतु बंडखोरी करणारे सर्व जण पराभूत होतील, असा दावा शरद पवार यांनी केला. आपण वास्तूस्थिती मांडण्यासाठी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अजित पवार यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाबरोबरील चर्चेचा मुद्दा उपस्थित केल्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, लोकशाहीत संवाद महत्वाचा आहे. त्यानुसार पक्षात एखाद्या विषयावर चर्चा होते. मात्र तो निर्णय नसतो. त्या अनुषंगाने आमच्यात चर्चा झाल्या. पण निर्णय झाला नव्हता. जो अंतिम निर्णय होतो तो पुढे जातो. पण आमचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आम्ही भाजपाला मदत केली नाही असे सांगत अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा पुनःर्विचार करावा असे सूचक वक्तव्यही केले.
पण सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाकडून लोकशाहीवादी संस्थां मोडकळीस आणण्याचे काम सुरु आहे. मी अनेक पंतप्रधानांचे राजकारण अर्थात इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांचे राजकारण जवळून पाहिले. हे सर्वजण विरोधकांचे म्हणणे ऐकायचे मात्र त्यांचा संपूर्ण आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मात्र सध्याचे सत्ताधारी विरोधकांचा आवाजच दाबून टाकत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या वयाच्या आणि निवृत्तीच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारले असता शरद पवार म्हणाले, मी अटल बिहारी यांचे वक्तव्या तुम्हाला सांगतो असे म्हणतं ‘न टायर्ड हूं, न रिटायर्ड…मे तो फायर हूं’ असा पलटवार शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला.
तसेच मी अजून म्हातारा झालेलो नाही, मी टायर्ड नाही आणि रिटायर नाही. मी अजूनही पक्षासाठी काम करत आहे असे सांगत माझ्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही. मला रिटायर होण्याचा सल्ला देणारे हे कोण आहेत? असा सवालच शरद पवार यानी केला. मी अजूनही काम करत आहे, असंही ते म्हणाले.
फुटीर नेत्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जे गेले त्यांच्या बद्दल दुःख नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या करिअरनुसार निर्णय घेण्याचा आणि वेगळा विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण एकदा गेल्यानंतर पुन्हा त्या साधन संपत्तीवर हक्क सांगणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत या हक्क सांगण्याच्या वृत्तीपासून त्यांनी परावृत्त व्हावं असा खोचक सल्लाही फुटीरांना दिला.
जर अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती बेकायदेशीर असेल तर प्रफुल्ल पटेल आणि इतरांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरते. प्रफुल्ल पटेल यांनीच अध्यक्षपदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये सर्व संमतीने माझी निवड करण्यात आली होती. अजित पवार आणि इतरांकडून (भुजबळ आणि पटेल) माझ्यावर होत असलेले हल्ले भाजपाच्या इशाऱ्यावरच होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अजितला मी चारवेळा उपमुख्यमंत्री बनवलं. त्यांना चांगली खाती दिली. निवडणुकीत पराभव होऊनही मी प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात मंत्री बनवलं. पीए संगमा याच्या कन्येसह इतरांना मंत्री बनवलं. पण मी सुप्रियाला मंत्रीपद दिलं नाही. ही घराणेशाही आहे काय? अजित जे सांगत आहेत ते चुकीचं आहे. त्यांचे आरोपच चुकीचे आहेत, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल पटेल हे एकेकाळचे तुमचे विश्वासू सहकारी सोडून जाण्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, मी माझे अॅसे समेंट (सहकाराऱ्यांचे कॅरेक्टर) मुल्यमापन करायला चुकलो. त्यात त्यांचा दोष काही नाही चुक माझी आहे असे सांगत फुटीर नेत्यांवर टीका टीपण्णी करण्याचे टाळले.