Breaking News

सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी… बीडच्या उत्तरदायित्व सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद...

राज्याचे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड, बारामती आणि बीडमध्ये झालेले स्वागत पाहून आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी झालो, त्याला जनतेमधून पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील ‘उत्तरदायित्व सभेला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सुनिल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.

सुनिल तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता रविवार, दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी कोल्हापूरला होणारी ‘उत्तरदायित्व’ सभा तपोवन या सर्वात मोठ्या मैदानात घेतली जाईल, अशी घोषणाही केली.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, दरम्यान आगामी काळात राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजनदेखील करण्यात येईल. तसेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेले तीनही पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक वरळी डोम, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व पक्षांचा समन्वय राखण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *