Breaking News

सुप्रिया सुळे यांचे कौतुगोद्गार की…अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नवी दिल्लीतील या कार्यक्रमासाठी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही पक्ष संघटनेत जबाबदारी सोपविण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे बँलार्ड पिअर्स येथे आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित दाद हे अमिताभ बच्चन असल्याचे कौतुगोद्गार काढले. मात्र दुसऱ्या क्षणी आपण चेहऱ्याला मत देणार की पॉलिसीला देणार असा सवाल केला.

पक्ष प्रदेश कार्यालयात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांचा सत्कार केला. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील कौतुगोद्वार काढले.

यावेळी पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले, अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. त्यांचा आवाजही चालतो, त्यांचा फोटोही चालतो, त्यांचा लूकपण चालतो, त्याचा ऑटोग्राफही चालतो. त्यामुळेच अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत असे स्पष्ट केले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण चेहर्‍यापेक्षा पॉलिसीवर का काम करत नाही असो सांगत सवाल करतानाच तुम्ही चेहर्‍याला मत देणार की पॉलिसीला मत देणार आहात. मला वाटते आपण पॉलिसीला महत्त्व दिले पाहिजे. केंद्राचे सोशल जस्टीस खाते पाहिले तर किती निधी आला, किती कार्यक्रम जाहीर झाले. मी संसदेत एक प्रश्न उपस्थित केला आहे, अनेक ‘एम्स’ झाले असे जाहीर केले जाते, परंतु किती ‘एम्स’ ऑपरेशनल आहेत आणि किती डॉक्टर आहेत याबाबत कधी विचारणा केली गेली का? त्यामुळे मुळ मुद्दा पॉलिसीचे काय झाले हाच समोर येतो असेही सांगितले.

जाहिरात वादानंतर नुकत्याच पालघर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काहीही घडले नसल्याची ग्वाही देताना फेविकॉलची जाहिरात केल्याबद्दल मिश्किल टिप्पणी करत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे – फडणवीस यांचे आभार मानले. सध्या प्रिंटरला बिझनेस मिळत असेल तर ठीक आहे. मात्र राजकारणी लोकांनी बेकायदा पोस्टर लावताना त्याचे पैसे भरले पाहिजेत अशी विनंती केली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बेकायदा पोस्टर लागतात तेव्हा त्याच्या वेदना होतात असे स्पष्ट करतानाच तुम्ही कायदे बनवता आणि तुम्हीच ते तोडणार असाल तर ते दुर्दैव आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडसावले.

‘आंब्याच्या झाडावर दगड मारला जातो बाभळीवर कोण मारत नाही’. त्यामुळे भाजपा आमच्यावरच टीका करणार दुसर्‍या कुणावर करणार अशी मश्किल टीपण्णी करायलाही सुप्रिया सुळे या विसरल्या नाही.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *