Breaking News

मविआतून शरद पवार बाहेर? काँग्रेस-ठाकरे गटाची प्लँन बीची चर्चा ठाकरे गटाच्या खासदाराकडून चर्चेची माहिती उघड

राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असताना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविताना शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याभोवतीच राजकारण फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे अधिकृत जाहिर करत भाजपाप्रणित सरकारचा भाग बनले. त्यातच शरद पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता ऐनवेळी दगलबाजी करण्याची पध्दत जवळपास देशाच्या राजकारणात सर्वपरिचित आहे. यापार्श्वभूमीवर पुतण्या अजित पवारने वेगळी भूमिका घेऊनही नुकतीच शरद पवार यांनी गुप्त भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नुकतीच भेट झाली या बैठकीत शरद पवार यांना वगळून महाविकास आघाडी पुढे नेण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाच्या खासदाराने दिल्याने एकच खळबळ माजली आहे.

सध्या देशातील राजकिय वातावरण पाहता भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याबाजूने तर राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबतची सहानूभूती कायम आहे. त्यामुळे जर लोकसभा निवडणूका झाल्याच तर काँग्रेसच्या जागा आणि ठाकरे गटाच्या जागा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राज्यात शरद पवार यांना आणि त्यांच्या पक्षाचे राजकिय महत्व वाढवायचे असेल तर काँग्रेसचे, ठाकरे गटाचे महत्व कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरद पवार हे एकाचवेळी अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपाशी सोयरीक करू पहात असल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येत असल्याच्या मुद्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाच्या खासदारांने दिली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून पध्दतीशीर पणे शरद पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला नारळ देऊन फक्त काँग्रेस आणि शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन पुढे जाण्याच्या शक्यतेबद्दल विचार असल्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी असा कोणाताही निर्णय झालेला नाही, असं सांगत आमचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. महाविकास आघाडी कायम राहण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट केले.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची भूमिका मांडतांना म्हणाले, आम्ही कालही स्पष्ट केलेलं आहे की जे भाजपाविरोधात जे कुणी लढणार आहे त्यांना आमच्यासोबत घेणार आहोत. त्यामुळं प्लॅन बी बाबत चर्चा सुरु होत आहेत त्या खऱ्या नाहीत, अशी स्पष्टोक्ती दिली.

Check Also

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, ४ जूनपासून जुमला पर्व संपणार…

महाराष्ट्रातील पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी २० मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *