Breaking News

टीडीपीकडून आंध्र प्रदेश बंदची हाक चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (९ सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक

आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (९ सप्टेंबर) सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (१० सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एका निवेदनात आंध्र प्रदेश टीडीपीचे अध्यक्ष के अचन्नयडू यांनी पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य लोक आणि नागरी समाजाला आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याची विनंती केली.

आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सीआयडीचे प्रमुख एन संजय यांनी शनिवारी सांगितले की, कौशल्य विकास महामंडळाच्या निधीच्या गैरवापराशी संबंधित फसवणूक प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा ३०० कोटी रुपयांचा आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *