Breaking News

शरद पवार म्हणाले, …पण त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत या नेत्यांवर निलंबनाची कारवाईः या आठ ठरावांना मंजुरी

मागील काही महिन्यांपासून सातत्याने अजित पवार हे भाजपाला जाऊन मिळणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अजित पवार हे भाजपाच्या सत्तेतही सहभागी झाले. मात्र अजित पवार यांनी जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा दाखल केला. तसेच आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचे सांगत शरद पवार यांच्याविरोधातील खदखदीला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर आज दिल्ली दौऱ्यावर गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पाडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, कोणाला काही तरी बनावंस वाटतं याच गैर काय? पण मतदारांना दिलेल्या आश्वासानांना सारत वेगळा विचाराने जाणाऱ्यांना आगामी निवडणूकीत किंमत मोजावी लागेल असा सूचक इशारा अजित पवार यांच्या गटाला नाव न घेता दिला.

यावेळी राष्ट्रीय कार्यकारणीने शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत खासदार सुनिल तटकरे, खासदार प्रफुल पटेल, एस.आर.कोहली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आमदारांवर निलबंन करण्यात येत असल्याचेही जाहिर केले. तसेच या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1676950813724512259?s=20

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, एक गोष्ट खरी आहे की, २०१९ मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं एक पत्र दिलं होतं. त्यात पक्षाचं पुढील धोरण काय असावं, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे, असं म्हटलं. त्यावर मी बैठक बोलावू असं म्हटलं होतं. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही असेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे की, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असं मतही व्यक्त केलं.
जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे की, याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल. राज्यातील सत्तेत बदल होतील आणि जनता राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातात सत्ता देतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कुणी काय केलं ते मला माहीत नाही. पण एक गोष्ट पक्की आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष मीच आहे. दुसरं कुणी स्वत:च्या नावाने विधान केलं असेल किंवा काही बोललं असेल तर ते तसं बोलू शकतात. याला काहीही महत्त्व नाही. यामध्ये काहीही तथ्य नाही.

Check Also

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरील चर्चेचे निमंत्रण स्विकारले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या जाहीर चर्चेचे निमंत्रण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *