Breaking News

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर दिल्लीत ठिकठिकाणी आणि देशभरात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलनात करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर तुरूंगातून अरविंद केजरीवाल हे आपल्या राज्य सरकारला काय निर्देश देतायत यावर काळजीपूर्वक लक्ष्य देत आहेत.

अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर सर्वात प्रथम केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी तुरुंगातून अरविंद केजरीवाल यांनी दिलेला संदेश वाचून दाखवित त्याचा व्हिडिओ एक्स या सोशल नेटवर्कींग साईटवर ट्विट केला. त्यानंतर दिल्ली राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आतिषी यांनीही अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेल्या संदेशाचा एक व्हिडीओ एक्सवर ट्विट केला. मात्र या दोन्ही व्हिडिओत आपच्या कार्यकर्त्यांना सध्या करण्यात येत असलेले आंदोलन थांबविण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले नाही.

त्यातच सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाले सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोलिसी यंत्रणांच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. त्यातच आतिषी यांनी अरविंद केजरीवाल हे तुरुंगातूनच राज्य सरकार चालवतील अशी घोषणा केली होती. त्यामुळे आगामी काळात या संदेशाच्या आदान प्रदानात जर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वेगळाच दिला तर मात्र दिल्ली पोलिसांची भलतीच गोची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणि त्याचा परिणाम केंद्रातील सत्ताधारी पक्षाला भोगावा लागेल याची भीती आहे.

या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे २८ मार्च २०२४ पर्यंत ईडीच्या कोठडीतच राहणार आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच ठेवले जाणार आहे. तर दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ही दिल्लीच्या उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे. २८ मार्चच्या आधी जर अरविंद केजरीवाल यांना जर दिल्ली उच्च न्यायालयाने जर जामीन मंजूर केला तर २८ मार्च नंतर अरविंद केजरीवाल हे निवडणूकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकतील. तसेच ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे प्रकरणही थांबेल.

मात्र अरविंद केजरीवाल हे ईडीच्या कोठडीत असताना जर राज्य सरकारला भलतेच आदेश देत केंद्रातील भाजपा सरकारसमोर भलताच पेच निर्माण होण्याची शक्यता भीती ईडीला वाटते. त्यामुळे तुरुंगातून अरविंद केजरीवाल हे त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांना काय संदेश देणार याची इत्यंभूत माहिती ईडीकडून घेण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *