Breaking News

Land For Job Scam प्रकरणी राबरी देवी, मिसा भारतींच्या विरोधात ईडीचे आरोपपत्र

बिहारमधील कथित Land For Job Scam प्रकरणी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सातत्याने ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र यासंदर्भात तेजस्वी यादव यांच्या विरोधातील चौकशीत फारसे काही हाती लागले नाही. त्यातच महागठबंधन आघाडीतील प्रमुख मोहरे असलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पुन्हा भाजपाच्या एनडीएमध्ये वापसी झाल्यानंतर पुन्हा एकदा ईडीकडून Land For Job Scam प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरी देवी, मिसा भारती, हेमा यादव यांच्यासह अमित कट्याल, हृदयानंद चौधरी, एम के इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, ए बी एक्सपोर्ट प्रा.लि. कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करत विशेष न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले. या या गुन्ह्यासंदर्भात आरोपपत्र ईडीने विशेष न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने या प्रकरणी गंभीर नोंद घेतल्याची माहिती ईडीने एक्स या मायक्रो ब्लॉगिंग सोशल साईटवरून दिली.

बिहारमध्ये भाजपासोबत युतीत स्थापन केलेल्या सरकारला उलथवून टाकत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सोबत घेत राजद आणि काँग्रेसच्या मदतीने महागठबंधन सरकार स्थापन केले. त्यानंतर Land For Job Scam प्रकरणी ईडीने बिहार सरकारमधील उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात ईडी अर्थात सक्तवसुली संचानलयाकडे पीएमएसए कायद्यातंर्गत तक्रार दाखल करत. ८ जानेवारी २०२४ रोजी ही तक्रार ईडीने दाखल केल्यानंतर तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी समन्स बजावित अनेक चौकशीला पाचारण केले.

परंतु तेजस्वी यादव यांच्या चौकशीत ईडीला काहीही ठोस आढळले नाही. त्यामुळे ईडीने या प्रकरणाची व्याप्ती बिहारच्या माजी मुख्यमंत्री तथा लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबरी देवी, तसेच कन्या मिसा भारती. हेमा यादव यांच्यासह अमित कट्याल, हृदयानंद चौधरी, एम के इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, ए बी एक्सपोर्ट प्रा.लि. कंपनीच्या विरोधात ईडीने गुन्हे दाखल केले. त्यानंतर यासंदर्भातील Land For Job Scam प्रकरणी ईडीच्या विशेष न्यायालयात काल २७ जानेवारी २०१४ रोजी याचिका सादर करण्यात आली. त्यावर ईडीच्या विशेष न्यायालयाने या गुन्ह्यांची तात्काळ दखल घेतल्याची माहिती ईडीने दिली. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात लगेच पुढील कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *