Breaking News

प्रदेशाध्यक्ष डि के शिवकुमार यांच्या वाढदिनानिमित्त काँग्रेसने दिली गटनेते (मुख्यमंत्री) पदाची भेट १३५ आमदारांचा एकमुखी पाठिंबा

कर्नाटकातील काँग्रेसच्या एकहाती यश मिळविण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि.के.शिवकुमार यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांचाही वाटा आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा निकालाच्या दिवसापासून सुरु होती. अखेर आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित १३५ आमदारांच्या बैठकीत सर्व आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी डि.के.शिवकुमार यांच्या नावाला सहमती दर्शवित शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ डि.के.शिवकुमार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले.

कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट होताच नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरु झाली. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक होईल. त्या बैठकीत सर्व आमदार आपला गटनेता ठरवतील त्यानंतर त्याचा प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपविला जाईल व पक्षांच्या वरिष्ठांकडून मान्यता मिळविल्यानंतर गटनेत्याची मुख्यमंत्री पदासाठी व्यक्तीचे नाव जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर आज नियोजित कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तीन नेत्यांचे पथक आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेता निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी सर्व आमदारांनी डि.के.शिवकुमार यांच्या निवडीला मान्यता दिली.

त्यानंतर मंजूर झालेला प्रस्ताव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे पाठविण्यात आला. यानंतर डि.के.शिवकुमार यांच्या गटनेता निवडीचा प्रस्ताव काँग्रेस हा कंमाडकडे सदर करण्यात आला. आता कर्नाटकच्या मुख्मंमंत्री पदाची अधिकृत घोषणा खर्गे यांच्याकडून होण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर डि.के.शिवकुमार यांच्या नावाला १३५ आमदारांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले.

डि.के.शिवकुमार यांची राजकिय कारकिर्द

डि.के.शिवकुमार यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या आरोपाखाली ईडी आणि आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. मात्र त्यांच्याविरोधात एकही पुरावा आढळून आला नाही. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीयुचे सरकार सरकार स्थानापन्न झाल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांना भाजपाने फोडून त्यांच्या मदतीने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले. बंडखोर आमदारांच्या सुटकेसाठी स्वतः सव्तः डि.के.शिवकुमार यांनी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी बंडखोर आमदारांना सोडविण्यासाठी मुंबईत येऊन धरणे आंदोलन सुरु केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *