Breaking News

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील कुस्तीगीर परिषदेत ब्रिजभूषणबाबत कोणती घेतली भूमिका? महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत महिला पैलवानांच्या बाजूने घेतली बाजू

सध्या संपूर्ण देशभरात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह सरण यांच्या विरोधात महिला कुस्तीगीरांकडून दिल्ली येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाची चर्चा होत आहे. तसेच याप्रकरणी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महिला नेत्या कोणीच बोलायला तयार नाहीत. तसेच काही अपवाद वगळता इतर नामवंत खेळाडू, राजकीय पक्षाचे नेतेही प्रतिक्रिया देण्यास उत्सुक नाहीत. यापार्श्वभूमीवर राज्य कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा आणि विशेष सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (शनिवारी ३ जून) पुणे येथील वारजे येथे पार पडली. त्यामुळे या सभेत कोणता निर्णय घेण्यात आला याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुस्ती खेळात देशाची मान उंचविणारे महिला कुस्तीगीरांकडून मागील दोन-महिन्यापासून सातत्याने राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग सरण यांच्या विरोधात लैगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी तर दिल्ली पोलिसांनी या महिला कुस्तीगीरांना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तसेच ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात भाजपाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कुस्तीगीर परिषदेची सभा वारजे येथे पार पडली. त्यावेळी ब्रिजभूषण प्रकरणी आणि महिला कुस्तीगीरांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर शरद पवार कुस्ती परिषदेत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे आयोजन शनिवारी ३ मे रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सभेतील निर्णयांची माहिती दिली.

या सभेला राज्यभरातील ४५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्या सभेतील ठरावाबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, दिल्ली येथील महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. त्याबाबत केंद्र सरकारने गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच त्या प्रकरणी दिल्ली सरकारने लक्ष घालून त्या मुलींना न्याय द्यावा. याबाबत बैठकीत ठरावही करण्यात आला असल्याचे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *