Breaking News

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये राज्यातील या ६७ शैक्षणिक संस्था केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र राज्य विद्यापीठाचा उपक्रम

भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन २०२३ चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला.

शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण १३ श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट ८५० संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या ११ संस्था

संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील १०० शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था,मुंबई ३० व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस ३४ वे स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (३५), रासायनिक तंत्रज्ञान संस्था-मुंबई (४१), सिम्बायोसिस इंटरनॅशनल – पुणे (५९), डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धा (७५), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठ – पुणे (८१), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- नागपूर (८२), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (८८), मुंबई विद्यापीठ – मुंबई (९६)

विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील १० विद्यापीठे

देशातल्या १०० सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील १० विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था- मुंबई हे विद्यापीठ रँकिंगमध्ये १७ व्या स्थानावर आहे. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठास १९ वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला २३ वी रँकिंग देण्यात आली आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल –पुणे (३२), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था –वर्धा (३९), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठातील–पुणे (४६), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (४७), मुंबई विद्यापीठ –मुंबई (५६), भारती विद्यापीठ – पुणे (९१), आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ९८ व्या क्रमांकावर आहे.

संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील ५ संस्था

संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील ५० संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ५ संस्थांचा समावेश आहे. मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ४ व्या स्थानावर आहे . तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई १० व्या स्थानावर असून होमी भाभा राष्ट्रीय संस्था – मुंबई १५ व्या , भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे २७ व्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई ३७ व्या स्थानावर आहे.

अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंगमध्ये राज्यातील ८ संस्था

अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील १०० अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ८ संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेला ३७ वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला ४१ वी रँकिंग प्राप्त झाली आहे. डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (५७), तर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- पुणे (७३) क्रमांकावर आहे.

महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये राज्यातील तीन महाविद्यालये

महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील १०० महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन ५७ व्या स्थानावर आहे . तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) ७९ व्या आणि नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था ८३ व्या स्थानावर आहे.

उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील ९ व्यवस्थापन संस्था

देशातील १०० उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ९ संस्थांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था ७ व्या स्थानावर तर मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी १० व्या स्थानावर आहे. सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे (१७), आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (२०) , SVKM नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई (२१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – नागपूर (४३), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(४५), प्राचार्य एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च –मुंबई (७३) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट –पुणे (७६)

औषधीय संस्थांमध्ये राज्यातील १८ संस्था

देशातल्या उत्कृष्ट १०० औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील १६ संस्थांचा समावेश आहे. पहिल्या १० औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई ११ व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी २९ व्या स्थानावर आहे. एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(३८), डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासीट्युकल सायन्स अँड रिसर्च –पुणे (४५) , आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर (५०), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(५१), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (५५), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी –नागपूर (६८), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई (७९), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद (८०), प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (९१), ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज ऑफ फार्मसी-पुणे (९३), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी -पुणे (९४), सी.यू.शाह कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (९५), आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी- पुणे ९६ व्या स्थानावर आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये २ महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील ४० महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ १५ व्या स्थानावर आहेत तर दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा २५ व्या स्थानावर आहे.

दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये ७ महाविद्यालय

दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील ४० महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सात महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ तिस-या स्थानावर आहे. शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर १५ व्या स्थानावर आहे. दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था-वर्धा (१७), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज-मुंबई (१९), शासकीय दंत महाविद्यालय-मुंबई (२९), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ –मुंबई (३८) आणि भारती विद्यापीठ (डिम्ड युनिव्हर्सिटी) डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल-पुणे ३९ व्या स्थानावर आहे.

देशातील ३० सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिम्बायोसिस विधी माहाविद्यालयाला ६ वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील ३० सर्वोत्कृष्ट वास्तुकला आणि नियोजन महाविद्यालयांमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर १२ वा क्रमांक पटकाविला आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रे या श्रेणीमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी-मुंबई ७ व्या क्रमांकावर तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ३६ व्या क्रमांकावर आहे. तसेच नाविन्य श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ७ व्या क्रमांकावर आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अजित पवार बाबा सिध्दीकी यांना म्हणाले, जनतेचे… समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी…

विरोधक राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी भेटायला गेले होते. ज्या घटना घडल्या त्याचे मी समर्थन करणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *