Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परिक्षा आता निवडणूकीनंतर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी मतदान
२८ एप्रिल २०२४ रोजी च्या दोन दिवस आधी अर्थात २६ एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी मधील लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

चवथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी मतदान
१९ मे २०२४ रोजीनंतर २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तरपूर्व, दक्षिण मुंबई आणि मुंबई दक्षिण मध्य मध्ये लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या कालावधीत एमपीएससीच्या होणाऱ्या दोन्ही परिक्षा रद्द करण्यात येणार आल्याचे एमपीएससी प्रशासनाने जारी केले.

 

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *