Breaking News

एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक

भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

एअर मार्शल रानडे यांनी ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांनी ३६ वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. लढाऊ विमानांच्या तुकडीचे आणि दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. रणनीती आणि हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. काबूल आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे.

हवाई दलाच्या मुख्यालयात त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर कार्यरत राहिले आहे. या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

एअर मार्शल रानडे यांना वर्ष २००६ मध्ये वायु सेना (शौर्य) पदक आणि वर्ष २०२० मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. एअर मार्शल संजीव कपूर यांचा हवाई दल सेवाकार्याचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाल्यानंतर एअर मार्शल रानडे यांनी त्यांच्याकडून महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Check Also

अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडे, विकासाच्या वाटेवर नेण्याची … सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेव

बा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींच्या तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *