Breaking News

शेअर बाजारचा सेनेक्सही तेजीत आणि निफ्टीही चढला सेन्सेक्स ३३३ अंकांनी वाढून ६६,५९८ वर बंद, निफ्टीही ९२ अंकांनी वाढला

शेअर बाजारात शुक्रवारी (८ सप्टेंबर) तेजी होती. सेन्सेक्स ३३३.३४ अंकांच्या वाढीसह ६६,५८९८.९१ वर बंद झाला. निफ्टी देखील ९२.९० अंकांनी वाढून १९८१९.९५ च्या पातळीवर बंद झाला. आज सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २१ शेअर्समध्ये वाढ तर ९ शेअर्समध्ये घसरण झाली. एनएसईवर १०४७ शेअर्स वाढीसह आणि ९८७ शेअर्स तोट्यासह बंद झाले.

आजच्या व्यवहारात सर्वात मोठा फायदा रियल्टी, तेल आणि वायू, ऊर्जा आणि भांडवली वस्तूंच्या समभागांमध्ये झाला. क्षेत्रीय निर्देशांकांत भांडवली वस्तू, तेल आणि वायू, पॉवर आणि रियल्टी १.५-२ टक्क्यांनी वधारले आहेत. तर फार्मा निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरून बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.९ टक्क्यांनी व स्मॉलकॅप इंडेक्स ०.४ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

दुसरीकडे आज डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत गुरुवारी भारतीय रुपया ८३.२१ च्या तुलनेत शुक्रवारी २७ पैशांनी वाढून ८२.९४ रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. एनटीपीसी, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, पॉवर ग्रिड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स वाढीसह बंद झाले. तर आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, टाटा स्टील, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेडचा आयपीओ ८ सप्टेंबर रोजी बंद झाला आहे. या आयपीओ मध्ये पैसे गुंतवण्याची आज शेवटची संधी होती. कंपनीचे शेअर्स १८ सप्टेंबर रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर सूचीबद्ध केले जातील. याआधी काल म्हणजेच गुरुवार ७ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात वाढ झाली होती. सेन्सेक्स ३८५ अंकांच्या वाढीसह ६६,२६५ वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये ११६ अंकांची वाढ होऊन तो १९,७२० च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २० समभागांमध्ये वाढ तर १० समभागांमध्ये घसरण झाली.

Check Also

सप्टेंबरमध्ये ही ५ कामे करणे आवश्यक, अन्यथा पडेल भुर्दंड आधार, २ हजाराच्या नोटा आणि अन्य महत्वाचे

सप्टेंबरमध्ये अनेक नियम बदलणार असून या नियमांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या महिन्यात डीमॅट खात्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *