Breaking News

ईएमएस लिमिटेडचा आयपीओ ८ सप्टेंबरला उघडणार पाणी आणि सांडपाणी संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट सेवा पुरवणारी कंपनी

ईएमएस लिमिटेड (EMS ltd ipo) चा आयपीओ ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. कंपनीने यासाठी २००-२११ रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओद्वारे ईएमएस लिमिटेड ३२१.२४ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ ७ सप्टेंबर रोजी उघडेल. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल.

आयपीओ तपशील

आयपीओ अंतर्गत १४६.२४ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय १७५ कोटी रुपयांचे ८२.९४ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. प्रवर्तक रामवीर सिंग आपले शेअर्स विकतील. ईएमएस लिमिटेडने पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी ५० टक्के, १५ टक्के नेट वर्थ व्यक्तींसाठी आणि उर्वरित ३५ टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.

प्री प्लेसमेंटमधून ३३.७६ कोटी उभारले

रेड-हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी कंपनीने १६ लाख शेअर्सच्या खाजगी प्लेसमेंटद्वारे (प्री-आयपीओ प्लेसमेंट) ३३.७६ कोटी रुपये उभारले. यामुळे आयपीओचा आकार आधीच्या १८० कोटींवरून ३३.७६ कोटी रुपयांनी कमी होऊन १४६.२४ कोटी रुपयांवर आला आहे.

निधी कुठे वापरणार

आयपीओतून मिळालेल्या निधीतून ईएमएस लिमिटेड खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी १०१.२४ कोटी रुपये वापरेल. याशिवाय, सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील खर्च केला जाईल. शेअर्सचे वाटप १५ सप्टेंबर रोजी होईल. २० सप्टेंबर रोजी यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित केले जातील. अयशस्वी गुंतवणूकदारांसाठी परतावा प्रक्रिया १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर शेअर्सचे लिस्टींग २१ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर होईल.

आर्थिक कामगिरी

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा एकत्रित नफा वार्षिक ३७.७ टक्क्यांनी वाढून १०८.७ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल ४९.५ टक्क्यांनी वाढून ५३८.२ कोटी रुपये झाला आहे. EBITDA ३२.४ टक्क्यांनी वाढून १४९ कोटी रुपये झाला, परंतु EBITDA मार्जिन गेल्या वर्षीच्या ३१.३ टक्क्यांवरून ७.७ टक्क्यांवर घसरले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

One comment

  1. Prakash Laxman Pathak

    राजकारणाच्या धबडग्यातून बाहेर अशा आर्थिक विषयावरील दोन बातम्या दोन दिवसात वाचायला मिळाल्या, बरे वाटले.. शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *