Breaking News

सिग्नेचर ग्लोबलचा आयपीओ २० सप्टेंबरला उघडणार ७३० कोटी रुपये उभारण्याची योजना

रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) चा आयपीओ २० सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. कंपनीला आयपीओद्वारे ७३० कोटी रुपये उभे करायचे आहेत. येत्या काही दिवसांत प्राइस बँड जाहीर केला जाईल.

सिग्नेचर ग्लोबल आयपीओ अंतर्गत ६०३ कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, १२७ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. हा आयपीओ २२ सप्टेंबर रोजी बंद होणार आहे.

सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) दिल्ली एनसीआरमध्ये परवडणाऱ्या आणि लोअर मिड सेगमेंट हाउसिंगमध्ये सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी असल्याचा दावा करते. कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी ४३२ कोटी रुपये वापरेल.

शिवाय, उर्वरित निधी भूसंपादन आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल. जून २०२३ पर्यंत कंपनीवरील थकित कर्ज रुपये ४९५.२६ कोटी होते आणि तिच्या चार उपकंपन्यांचे कर्ज १२३.८६ कोटी रुपये होते.

आयपीओमध्ये ७५ टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव ठेवण्यात आले आहेत.त्यातील ६० टक्के शेअर्स अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. याव्यतिरिक्त, उर्वरित १५ टक्के शेअर्स उच्च नेट वर्थ व्यक्तींसाठी आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *