Breaking News

ऱिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे शेअर बाजार आणि निफ्टी बाजार निर्देशांकात उसळी आतापर्यंतच्या सर्वाधिक निर्देशांकावर बाजार बंद

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रूपयांचा डिव्हिडंड देण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर आज शेअर बाजार आणि निफ्टी ५० च्या निर्देशांकात मोठी वाढ झाली. त्यामुळे दुपारपर्यंत शेअर्स बाजारात S&P BSE सेन्सेक्स १.६१% वाढून ७५,४१८,०४ वर स्थिरावत बंद झाला. तर तर NSE निफ्टी50 १.६४ टक्काने वाढून २२,९६७.६५ या सर्वात उच्चांकीवर हे दोन्ही बाजार बंद झाले.

S&P BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी50 ने सर्वकालीन उच्चांक गाठल्यामुळे बेंचमार्क शेअर बाजार निर्देशांकात गुरुवारी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने ७५,४०७.३९ चा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला, तर निफ्टी50 देखील सत्रादरम्यान ३०० अंकांनी वाढून २२,९५९.७० इतका आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला. दुपारी ३:१३ पर्यंत, सेन्सेक्स १,२३६.२१ अंकांनी वाढून ७५,४५७.२७ वर उभा स्थिरावला, तर निफ्टी50 ३८१ अंकांनी वाढून २२,९७८.८० वर पोहोचला आणि बाजार बंद झाला.

सेन्सेक्स, निफ्टी यांनी मार्च १ नंतरची त्यांची सर्वात मोठी कामगिरी नोंदवली असून, जी अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान आर्थिक वाढीमुळे वाढली, तर ब्लू-चीपने डिसेंबरच्या सुरुवातीपासूनची सर्वात मोठी कामगिरी सहा सत्रांपर्यंत वाढवली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याची घोषणा केल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. विशेष म्हणजे अनेक अर्थतज्ञांच्या मते या वाढीचा अंदाजापेक्षा जास्तीची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रिझर्व्ह बँकेने इतक्या मोठ्या प्रमाणावर पु्न्हा एकदा निधीचा लाभांश देणे अर्थव्यवस्थेसाठी अप्रत्यक्ष दर कपातीप्रमाणेच पाहिले जाते, ज्याचा संपूर्ण वित्तीय बाजारांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वित्तीय साठा १.९% इतक्यावर बंद झाला. दोन्ही सरकारी आणि खाजगी बँकांना १.७% ते २.१% पर्यंत वाढ दिसून आली.

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष विष्णू कांत उपाध्याय म्हणाले की, बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हेवीवेट्समधील लक्षणीय नफ्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली.

 

Check Also

मोटार विम्याबाबत आयआरडीएआयने आणला नवा नियम २४ तासाचा आत विमा अहवाल सादर करणे आवश्यक

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआय IRDAI ने नवीन नियमांची मालिका सादर केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *