Breaking News

उद्योगांना लागणाऱ्या जमिनी अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

उद्योगांना लागणाऱ्या जमिनी अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत लवकरच सुलभता आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील सन २००० पूर्वीच्या उद्योगांना आवश्यक जमीन अकृषिक करण्याकरिता येत असलेल्या अडचणीसंदर्भातील महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोटमारे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, बफर झोन, अकृषिक ठरविणे याबाबत महसूल बरोबरच नगरविकास विभागाकडूनही परवानगी देण्यात येत असल्याने या विषयात नगरविकास विभागाचेही मत घेण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक उद्योगांना लागणाऱ्या जमिनी अकृषिक करण्याबाबत काही अडचणी येत आहेत, याबाबत नेमक्या अडचणी समजून शिथिलता देता येते का हे तपासून पाहण्यात येईल.

Check Also

आर्थिक सर्व्हेक्षणानंतर अर्थसंकल्पातील कर प्रणालीवरून उद्योग जगतात उत्सुकता अनेक नवे नियम शेअर बाजारापासून उत्पन्न करातही वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ जवळ येत असताना, दलाल स्ट्रीट इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह बाजारांवर परिणाम करू शकणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *