Breaking News

आरआरआर चित्रपटातील या गाण्यामुळे भारताला मिळाला पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार नाचो नाचो या गाण्याला ओरिजनल सॉग्ज वर्गवारीत मिळाला पुरस्कार

कोरोना काळ ओसरल्यानंतर अनेक नवे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होते. त्यातच बाहुबलीच्या अदभूत यशानंतर एस. एस. राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट येत असल्याने अनेकांचे लक्ष त्याकडे लागून राहिले होते. त्यानुसार हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याने हजारो कोटी रूपयांची कमाई केली. तसेच अनेकांनी या चित्रपटाच्या वेगळ्या हाताळणीमुळे सिनेरसिकांबरोबर समिक्षकांनीही पसंती दिली. यंदाच्या गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर पुरस्कारासाठी आरआरआर चित्रपट पाठविण्यात आला. यातील गोल्डन ग्लोब पुरस्कार आरआरआर या चित्रपटातील नाचो, नाचो या हिंदी व्हर्जन असलेल्या मात्र मुळ नाटो नाटो या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉग्ज आणि नॉन इंग्रजी सॉग्ज या कॅटेगरीत जाहिर झाला.

एखाद्या भारतीय चित्रपटातील गाण्याला अशा पध्दतीचा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ.

याआधी १९८८ मध्ये ‘सलाम बॉम्बे’ आणि २००१ मध्ये ‘मॉन्सून वेडिंग’ या दोन चित्रपटांना ‘फॉरेन लँग्वेज फिल्म’ विभागात नामांकन मिळाले होते. वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही चित्रपट मीरा नायर यांनी दिग्दर्शित केले होते. मात्र या दोन्ही चित्रपटांचा आशय आणि ‘आरआरआर’चा विषय-मांडणी या दोन्हींची जातकुळी वेगळी आहे. त्यातही ‘आरआरआर’ला ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ विभागात गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला असता तर इतिहास घडला असता. अर्थात ते यश पदरी पडले नसले तरी संगीतकार एम. किरवानी यांच्या संगीताची जादू ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांच्या परीक्षक समितीला भुरळ पाडणारी ठरली हेच खरे.

ऑस्कर पुरस्कारांसाठीच्या अंतिम नामांकनांकडे देशभरातील सिनेमाप्रेमींचे कान एकवटलेले असतानाच तिथे दूर लॉस एंजेलिसमध्ये ८०व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली. आणि जगभरात पुन्हा एकदा एस. एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’चा डंका वाजला. गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ आणि ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ अशा दोन विभागात ‘आरआरआर’ चित्रपटाला नामांकन मिळाले होते. त्यापैकी ‘अर्जेंटिना, १९८५’ या चित्रपटाने ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ पुरस्कार जिंकला आणि या विभागातील ‘आरआरआर’ची संधी हुकली. मात्र त्याआधीच या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ पुरस्कार आपल्या खिशात टाकत भारताला पहिल्यावहिल्या गोल्डन ग्लोब पुरस्काराची सलामी दिली होती.

‘आरआरआर’ चित्रपटाला मिळालेले हे सोनेरी यश विविध अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. राजामौलींचे दिग्दर्शन असलेला आणि रामचरण – एनटीआर ज्युनिअर या कलाकारद्वयीचा हा चित्रपट खरेतर मसाला किंवा मनोरंजक चित्रपटांच्या यादीत मोडणारा आहे. आत्तापर्यंत ऑस्कर वा गोल्डन ग्लोबसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांसाठी निवडलेल्या चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. आशयघन वा वैचारिक, गंभीर विषय मांडू पाहणाऱ्या चित्रपटांचा या पुरस्कारांसाठी सामान्यत: विचार केला जातो, मात्र दक्षिणेकडील अल्लूरी सीताराम राजू आणि कोमारम भीम या वास्तवातील दोन क्रांतिकारकांच्या आयुष्यावर रचलेली ‘आरआरआर’ची काल्पनिक कथा गाणी, नृत्य, ॲक्शन, देशभक्तीचा रंग अशा सगळ्या प्रकारच्या भावनिक नाट्यपूर्ण मनोरंजक आशयाचा मुलामा देत रंगवण्यात आली होती.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *