Breaking News

ऑगस्टमध्ये १८ लाख वाहनांची विक्री, टोयोटाच्या विक्रीत ५३ टक्के वाढ फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने ऑगस्ट २०२३ चा अहवाल जाहिर

ऑगस्ट महिन्यात भारतीय वाहन बाजारात एकूण १८ लाख १८ हजार ६४७ वाहनांची विक्री झाली. विक्रीत वार्षिक आधारावर ८.६३ टक्के वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १६ लाख ७४ हजार १६२ वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

वाहने बनवणाऱ्या कंपन्यांसाठी ऑगस्ट महिना चांगला होता. गेल्या महिन्यात टोयोटाच्या वाहनांच्या विक्रीत ५३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. विक्रीच्या बाबतीत नेहमीप्रमाणे यावेळीही मारुती सुझुकीची वाहने अव्वल राहिली. टोयोटा व्यतिरिक्त मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, एमजी मोटर इंडिया, अशोक लेलँड आणि महिंद्रा यांनी विक्रीत वाढ नोंदवली आहे. बजाज ऑटो आणि टाटा मोटर्सच्या वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे.

मारुती सुझुकी अव्वल

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ऑगस्टमध्ये १,८९,०८२ वाहनांची विक्री केली. एका महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. गेल्या महिन्यात कंपनीने १४ टक्के अधिक युनिट्स डीलर्सना पाठवले. ऑगस्ट २०२२ मध्ये १,६५,१७३ युनिट्स पाठवले होते. ऑगस्टमध्ये एकूण प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री १,५६,११४ युनिट्सवर पोहोचली, जी ऑगस्ट २०२२ मध्ये १,३४,१६६ युनिट्सच्या तुलनेत १६ टक्क्यांनी अधिक आहे. ऑल्टो, एस-प्रेसो सारख्या छोट्या कारची विक्री ऑगस्ट २०२२ मध्ये २२,१६२ युनिट्सवरून 12,209 युनिट्सवर घसरली. बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस आणि स्विफ्ट सारख्या कॉम्पॅक्ट कारच्या ७२,४५१ युनिट्सची विक्री झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये हा आकडा ७१,५५७ युनिट्स होता. ऑगस्टमध्ये कंपनीची निर्यात २४,६१४ युनिट्स होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात २१,४८१ युनिट्स होती.

ह्युंदाईच्या विक्रीत १५ टक्के वाढ

ह्युंदाई मोटर इंडियाची ऑगस्टमधील घाऊक विक्री वार्षिक १५ टक्क्यांनी वाढून ७१,४३५ युनिट्स झाली. कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये आपल्या डीलर्सना ६२,२१० युनिट्स पाठवले होते. गेल्या महिन्यात देशांतर्गत विक्री नऊ टक्क्यांनी वाढून ५३,८३० युनिट्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ४९,५१० युनिट्स होती. गेल्या महिन्यात निर्यात ३९ टक्क्यांनी वाढून १७,६०५ युनिट्स झाली, जी ऑगस्ट २०२२ मध्ये १२,७०० युनिट्स होती.

महिंद्राच्या विक्रीत १९ टक्के वाढ

महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये वार्षिक १९ टक्क्यांनी वाढून ७०,३५० युनिट्सवर पोहोचली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये कंपनीने ५९,०४९ युनिट्सची विक्री केली होती. कंपनीची देशांतर्गत विक्री ऑगस्टमध्ये २५ टक्क्यांनी वाढून ३७,२७० युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात ते २९,८५२ युनिट होते. देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात २५ टक्क्यांनी वाढून ३७,२७० युनिट्सवर गेली आहे. कंपनीच्या निर्यातीत वर्षभरात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये. २,४२३ युनिट्स निर्यात झाली.

एमजी मोटर इंडियाच्या विक्रीत वाढ

ऑगस्टमध्ये एमजी मोटर इंडियाची किरकोळ विक्री वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांच्या वाढीसह ४,१८५ युनिट्स झाली. कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये ३,८२३ युनिट्सची विक्री केली होती. कंपनी आपल्या मध्यम आकाराच्या SUV Aster चे ‘ब्लॅक एडिशन’ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

अशोक लेलँडच्या विक्रीत १० टक्के वाढ

व्यावसायिक वाहन निर्माता अशोक लेलँडची वाहन विक्री ऑगस्टमध्ये १० टक्क्यांनी वाढून १५,५७६ युनिट झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने १४,१२१ वाहनांची विक्री केली होती. ऑगस्टमध्ये कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री नऊ टक्क्यांनी वाढून १४,५४५ युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १३,३०१ युनिट्सची होती. देशांतर्गत बाजारपेठेत मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांची विक्री १७ टक्क्यांनी वाढून ९,०१३ युनिट झाली, जी ऑगस्ट २०२२ मध्ये ७,६७१ युनिट्स होती.

टाटा मोटर्सच्या विक्रीत घट

टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर घटून ७८,०१० युनिट्स झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये कंपनीने ७८,८४३ युनिट्सची विक्री केली होती. कंपनीची देशांतर्गत विक्री ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर किंचित घट होऊन ७६,२६१ युनिट्स झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये ते ७६,४७९ युनिट होते. कंपनीच्या देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री ३.५ टक्क्यांनी घसरून ४५,५१३ युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ४७,१६६ युनिट्स होती. एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री ऑगस्ट २०२२ मध्ये ३१,४९२ युनिट्सवरून १.९ टक्क्यांनी वाढून ३२,०७७ युनिट झाली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *