Breaking News

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणार लाभांश ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणारी पहिलीच बँक

सध्या कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या भागधारकांना लाभांशाची घोषणा केली आहे. ब्रोकिंग क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १६ ऑक्टोबर रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले. यावेळी कंपनीने लाभांश देण्याचीही घोषणा केली. गेल्या ६ महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा सप्टेंबर तिमाहीत नफा वाढून ४२४ कोटी रुपये झाला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत नफा ३०० कोटी रुपये होता. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने उत्पन्नातही प्रचंड वाढ नोंदवली आहे. कंपनीचे उत्पन्न ८५८ कोटींवरून १२४९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वार्षिक आधारावर उत्पन्न आणि नफा या दोन्हीत ४०-४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने भागधारकांसाठी प्रति शेअर १२ रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने २७ ऑक्टोबर ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. भागधारकांना १५ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी अंतरिम लाभांशाची रक्कम मिळेल. यापूर्वी मार्च तिमाही निकालादरम्यान प्रति शेअर ९.२५ रुपये अंतिम लाभांश देण्यात आला होता.

एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने सांगितले की, आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे अनुपालन आणि कायदेशीर प्रमुख अंकित शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अंकित शर्मा यांचा राजीनामा ७ डिसेंबरपासून लागू होणार आहे. मजबूत निकाल आणि लाभांश घोषणेमुळे कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणुकदारांचे लक्ष असणार आहे.

Check Also

केंद्रीय अर्थसंकल्पात कर कपातीमुळे या वस्तू स्वस्त तर त्या होणार महाग अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली घोषणा

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *