Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” या ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणाऱ्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या योगदानास अभिवादन

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा येत्या २१ ऑक्टोबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,नरिमन पॉइंट, मुंबई येथे सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि NICE द्वारे आयोजित हा सोहळा स्मृतिशेष मधूकरराव तामगाडगे ट्रस्टच्या सहकार्याने पार पडणार आहे. भारतीय रिजर्व्ह बँक, भारतीय बँक व्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणाऱ्या या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय योगदानास अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे.

हा कार्यक्रमात अमेरिकेच्या प्रसिध्द कोलंबिया विद्यापीठासह SOAS युनिव्हर्सिटी लंडन नॉलेज पार्टनर म्हणून सामील होत आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स द्वारे बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेतील अमेरिका आणि लंडन येथील कालावधी, त्यांचे कार्य यांवर एक सादरीकरण सादर केले जाणार आहे. तर कोलंबिया विद्यापीठा मार्फत आंबेडकराचे कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्य आणि जडणघडणीची प्रक्रिया सादरीकरण करुन आंदराजली अर्पण केली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी मान्यवर वक्ते मा. शरद पवार, एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह मा. कुमार केतकर, मा. सुप्रिया सुळे आणि इतर वक्ते बाबासाहेबांच्या आर्थिक योगदानाच्या प्रवासाचा मागोवा घेतील. तसेच नामवंत अर्थतज्ञ प्रा.स्वाती वैद्य, डॉ.मनिषा करणे, डॉ. अजित रानडे, डॉ. जयती घोष, डॉ. वामन गवई आणि डॉ. गणेश देवी आंबेडकरांच्या भरीव आर्थिक योगदानावर प्रकाश टाकतील. या कार्यक्रमात न्यायमूर्ती सी. एल थूल आणि डॉ. सुकेश झंवर यांचे हस्ते नवीन पिढीतील उद्योजक अविचल धिवार, भरत वानखेडे, निलेश पठारे, अक्षय दावडीकर, आणि विशाल पाटणकर यांना सन्मानित केलं जाईल.

विशेष म्हणजे उरूवेला या प्रकाशन संस्थेतर्फे बा भीमा या कॉमिक बुक सिरीजचा चौथा भाग प्रकाशित केला जाणार असून यात भागात डॉ. आंबेडकरांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात सदर ग्रंथ लिहीतानाचा संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. तसेच बाबासाहेबांच्या जडणघडणीत ज्या महामानवाची मोलाची भूमिका होती त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या आयुष्यावरील पहिलं वहिलं कॉमिक बुक देखील या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात विक्रांत भिसे, भूषण भोंबाळे,मयुरी च्यारी, लक्ष्मण चव्हाण, प्रभाकर कांबळे, सुरज कांबळे, आकांक्षा धनराज पाटील, सुधीर राजभर, पिसुर्वो जितेंद्र सुरळकर आणि क्युरेटर- सुमेश मनोज शर्मा या भारताच्या आघाडीच्या दृष्यचित्रकारांद्वारे विशिष्ट पद्धतीच्या कलाकृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांना व त्यांच्या आर्थिक योगदानास आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने आज आपल्या देशाच्या आर्थिक उन्नतीचे प्रतीक म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द रूपी आणि बाबासाहेबांचे अर्थशास्त्र साजरं करण्यासाठी शताब्दी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

आजपासून UPI वापराचे बदलले नियमः जाणून घ्या कोणते बदल केले

२०१४ सालापासून ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या व्यक्तींच्या फोनवर सायबर हल्ला करत ऑनलाईन बँकिंगमधून सर्वसामान्य आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *