Breaking News

किरण माने यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची खास पोस्ट मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. बिगबॉस घरौं बाहेर पडल्यांनंतर त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्याची संख्या द्विगुणित वाढली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी लिहिलं आहे,”जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्सवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात. तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे”.

काय लिहिले आहे पोस्टमध्ये वाचा

जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणार्‍या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे.

तर काही दिवसांपूर्वी किरण माने साताऱ्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. किरण माने म्हणाले होते,“मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ‘करो या मरो’ या स्टेजवर आला आहे.माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत आहे ! योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा. आपण आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार… आपण मिळवणारच…कुणाचा बाप ते थांबवू शकत नाही..जय जिजाऊ…जय शिवराय…जय भीम..एक मराठा लाख मराठा“.असे लिहीत त्यांनी सवांचे लक्ष वेधून घेतले होते.

Check Also

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान ८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे वितरण

दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *