Breaking News

अखेर “त्या” चित्रिकरणाबद्दल वैष्णवी पाटीलचा माफीनामा व्हिडिओ शेअर करत माफी मागितली

राजमाता जिजाऊ आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवत पुणे शहर वसविले त्या पुण्यातील ऐतिहासिक अशा लाल महालात चित्रपटातील लावणी नृत्य असलेल्या गाण्याचे चित्रिकरण केल्याप्रकरणावरून सर्वचस्तरातून टीकेची झोड उठत आहे. यापार्श्वभूमीवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर करणारी आणि नृत्यांगणा तथा अभिनेत्री वैष्णवी पाटील हिने व्हिडिओ शेअर करत त्या गाण्यामुळे भावना दुखावल्याबद्दल सर्वांची माफी मागते असे सांगत माफीनामा जाहिर केला.

यासंदर्भातील एक व्हिडिओ तीने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे.

लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता स्वतः डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडीओत तिने माझ्याकडून लालमहालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते असे तीने जाहिर केले.

वैष्णवी पाटील म्हणाली, काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रेष्ठ जिजाऊंच्या लाल महालात चंद्रा लावणीवर डान्स व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करताना त्यावर वाद होईल असं काहीच माझ्या मनीध्यानी आलं नव्हतं. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ बनवायला गेले होते. कुणाचंही मन दुखावण्याचा, शिवप्रेमींचं मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः एक शिवप्रेमी आहे. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळलं असेही तिने आपल्या व्हिडिओत स्पष्ट केले.

ज्या क्षणी मला माझ्याकडून चूक झाली हे कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलीट केला होता. परंतू मी तो व्हिडीओ डिलीट करण्याआधीच माझ्या चाहत्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला. मी सर्वांना तर सांगू शकत नाही, पण मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हिडीओ डिलीट केला. आत्ताही मी माझ्या चाहत्यांना व्यक्तिगतपणे तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत असल्याचेही तिने आपल्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे.

माझ्याकडून लालमहालात लावणी व्हिडीओ शूट करण्याची चूक झाली आहे. माझ्या मनात काहीच नव्हतं. मी जाणूनबुजून केलं असंही नाही. असा विचार मी माझ्या स्वप्नातही करू शकत नाही. गाणं चांगलं होतं म्हणून मी तो व्हिडीओ केला. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली. ही चूक मी मान्य करते. सर्व शिवप्रेमी आणि माझ्या चाहत्यांची मी माफी मागते. तसेच जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला धक्का बसेल असा माझा हेतू नव्हता असेही तीने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले.

दरम्यान वैष्णवी पाटील हिच्यावर लाल महालातील नृत्याप्रकरणी आणि चित्रिकरणामुळे भावना दुखावल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिच्याबरोबर अन्य तीन जणावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

https://www.instagram.com/tv/CdyTF-eD5T6/?utm_source=ig_web_copy_link

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *