Breaking News

Tag Archives: हसन मुश्रीफ

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या. मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व …

Read More »

सर ज.जी. रुग्णालयात हृदय, किडनी व यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

सर ज.जी रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदय, किडनी व यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी आवश्यक साधने व उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. तसेच सर ज. जी. समूह रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरण करण्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. …

Read More »

राज्य सरकारचे आवाहनः एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश …

Read More »

मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर मंत्री हसन मुश्रीफ वैद्यकीय यांनी घेतला वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा

येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण… कोल्हापूर येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ

आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह बरोबर डर्टी डजन मधील एकाला पाहिले देश बंदुकीवर नाही संविधानावर चालतो हे सरकार मराठी माणसांच्या विरोधातलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारमुळे पालक-विद्यार्थी देशोधडीला लागणार कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा महायुतीचा निर्णय

राज्यातील खाजगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने तात्काळ स्थगित करावा. कारण महायुती सरकारने असंविधानिकपणे, कायद्याची पायमल्ली करुन आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आर्थिक …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, आदिवासी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या...

राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा. वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पिककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील ९६९८ आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा. आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार …

Read More »

१० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० (एम.बी.बी.एस.) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी सोडा नवे कर्जही नाही न्यायालयाच्या निकालाचा राज्य सरकारकडून अवमान

राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारने कोल्हापूरातील ४४ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवित कर्जमाफी देण्यास नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना कर्ज माफीचा निर्णय प्रलंबित ठेवत चालू वर्षासाठी पीक कर्ज देण्याचे आदेश दिले. मात्र त्यावर २०१८ सालापासून राज्य सरकारने कोणतीच कार्यवाही …

Read More »