Breaking News

जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार, तुमचे सारखे नेते सोबत असल्याने पवार साहेब… राष्ट्रीय राजकारणात पवार साहेब यांची छबी खराब करण्यासाठी आखण्यात आलेल्या प्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणात असलेला धबधबा वजन कमी करण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे त्यानुसार हे काही गोष्टी घडत आहे. साहेबांन विरोधात अस्वस्थता निर्माण करायची त्यांच्या जवळचे माणसं त्यांच्या नेतृत्वाविषयी बोलतात. सर्व त्यांच्याकडून बळजबरीने बोलून घेण्यात येते की? माहित नाही, परंतु पवार साहेबांची छबी खराब करण्याचा राष्ट्रीय प्लॅन आहे. त्यातील हा एक भाग आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी ज्या व्यक्तींना अनेक वर्ष आमदार केलं त्यांना मंत्रीपद दिली ते व्यक्ती आज शरद पवार साहेब यांच्या कर्तुत्वाविषयी बोलत आहे पवार साहेबांचे राष्ट्रीय राजकारण ५२ वर्षापेक्षा अधिक आहे जे या व्यक्तींच्या वयाच्या इतके भी नाही आहे अशा व्यक्तींकडून पवार साहेबांविषयी बोलण्यात येत आहे हे एक बालिशपणाच उत्तम उदाहरण आहे. पवार साहेब यांनी उभा केलेला पक्ष तुम्ही बळकवण्याचा प्रयत्न करत आहात जर तुमच्यात धमक असेल तर स्वतःचा पक्ष तयार करून मैदानात या असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याकडे तुमच्यासारखी माणसं असल्याने स्वबळावर सत्ता आणू शकले नाही. कोणत्याही निवडणूक असो किंवा युद्ध असो त्यामध्ये सरदारांचे महत्त्व अधिक असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची स्थापना करताना महाराजांना सरदार चांगले मिळाले म्हणून स्वराज्य स्थापन करण्यात आले. मात्र तुमच्यासारखे सरदार असल्यामुळेच शरद पवार साहेब यांना एक हाती सत्ता आणता आली नाही. तुमच्यासारखे साहेबांसोबत असताना सुद्धा साहेबांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान मिळवले आहे तसेच चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद देखील भूषवले आहे. असे प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की तुमच्यासारखे माणसं जवळ असल्याने शरद पवार साहेब देशाचे नेते कसे काय होऊ शकतात तुमचं कर्तुत्व काय आहे हे तर सांगा. पवार साहेबांमुळे तुम्हाला आमदार होता आलं पवार साहेबांमुळेच तुम्हाला अनेक सहकारी संस्थेमध्ये स्थान मिळालं तुमचं वैयक्तिक कर्तृत्व काय आहे असा प्रश्न देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे शरद पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही बोललात म्हणून मला आज बोलावं लागत आहे. जर तुम्ही असेच पवार साहेबांनविरोधात बोलत असाल तर मी सदैव तुमच्या विरोधात बोलणार. शरद पवार साहेबांनी ज्या व्यक्तीला आपला सरदार म्हणून ओळख दिली त्यांनीच आपली तलवार खाली टाकून तडजोड केली असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

शरद पवार साहेबांन विरोधात बोलताना पवार साहेबांनी तुम्हाला आजपर्यंत ज्या पदांवर बसवलं त्या पदांचा पहिले राजीनामा दिला पाहिजे पवार साहेबांविरोधात बोलल्याने तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही.

कांद्याच्या निर्यातीवर ४०% टॅक्स लावणे म्हणजे शेतकऱ्यांना मारण्यासारखे आहे. त्यावरील ४०% टॅक्स लावण्याचे कारण देशातील सत्तारूढ पक्षाने राजकीय स्वार्थासाठी हा निर्णय घेतला आहे. देशातील सत्तारूढ पक्ष हा केवळ व्यापारांसाठी निर्णय घेत आहे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी रस्त्यावर आलं तरी या केंद्र सरकारला त्यात काहीही फरक पडत नाही. देशातील भाजप सरकार ही शेतकरी विरोधी सरकार आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब २००४ मध्ये कृषीमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी त्या खात्याची परिस्थिती बराबर नव्हती. २०१४ मध्ये ज्यावेळी कृषी मंत्री असताना देशातील शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले होते. शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना भारतातून ३६ देशांमध्ये आपण अन्य धान्य पूर्वत होतो. मात्र आता भाजपा सरकारच्या कार्यकाळात दुसऱ्या देशातून भारतात धान्य आणण्यात येत आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात आपण कृषी क्षेत्रात मागे पडलो आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, ही राजकारण करण्याची वेळ नाही…

वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *