Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोजगारावर चकार शब्द नाही, मात्र मोफत रेशन वाटपाचा…

मागील नऊ वर्षापासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच सरकारची पाट थोपटून घेत कोरोना काळापासून देशातील गरीब आणि कष्टकरी वर्गाला मोफत धान्य देण्याची घोषणा सुरु केली. ती पुढील पाच वर्षे अशीच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगत माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपस्थित केलेल्या सोलापूरातील तरूणाईला आवश्यक असलेल्या रोजगाराच्या मुद्यावर कोणतेही भाष्य न करता पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनांमुळे २५ कोटी नागरिक द्रारिद्र्य रेषेच्या बाहेर आल्याचे आवर्जून सांगितले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी ही अशाच गरीब कष्टकरी लोकांच्या वस्तीत रहात होतो. पण मध्यंतरीच्या काळात गरिबी हटावच्या घोषणा काही जणांकडून करण्यात आल्या. परंतु देशातील गरिबी कधी हटविलीच नाही असे सांगत अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेला आणि काँग्रेस पक्षावर केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन तीन वर्षापूर्वी मी येथे आलो होतो. त्यावेळी मी सांगितले होते की कामगारांच्या घराच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो आता घरांच्या चाव्या सुपुर्द करण्यासाठीही मीच येणार म्हणून. त्यानुसार माझ्याच कारकिर्दीत केलेल्या भूमिपूजनाच्या काम पूर्णत्वास जाताना आणि त्यातून हजारो गरीब कामगारांना मिळत असलेली घरे पाहुन आनंद होत असल्याचे सांगत असताना स्वर त्यांचा गदगदल्याचा अनुभव उपस्थित समुदायाला आला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी येत्या २२ जानेवारी रोजीला राम मंदिरात राम मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. त्यादिवशी सर्वांनी दिवे लावून दिवाली साजरी करावी असे आवाहनही उपस्थित जनसमुदायाला केले.

कार्यक्रमाच्या शेवटी काही निवडक लाभार्थ्यांना घराच्या चाव्यांचे प्रातिनिधीक वाटपही करण्यात आले.

सोलापूरशी नाते जोडताना जॅकेट पाठविणाराचे पंतप्रधानांना नावच आठवेना

तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सोलापूरशी आपले जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगत त्यावेळी आपण एकदा सोलापूरात आलो होतो. त्यावेळी वस्त्रोद्योगातील एकाशी माझी मैत्री झाली होती. त्याने कोणताही नवा पोषाख किंवा जॅकेट निर्माण केले की मला पाठवून देत असतं. एकेदिवशी त्याला मी फोन करून मला जॅकेट पाठवून देत जाऊ नकोस असेही ठणकावून सांगितले. तरीही त्याने दरवेळी नवे जॅकेट बनवून पाठविणे काही बंद केले नाही. मात्र त्या जॅकेट बनवून पाठविणाऱ्याचे नाव मला सध्या आठवत नसल्याचे सांगत जूने नातं असल्याचे स्पष्ट केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः इलेक्ट्रॉल बॉण्ड बेकायदेशीर, एसबीआयने सर्व माहिती सादर करावी

देशातील सर्वच राजकिय पक्षांना निवडणूक काळात मिळणारा निधी कोणत्या मार्गाने जमा होता, याबाबत देशातील जनतेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *