Breaking News

कार्याध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रफुल पटेल म्हणाले, आमचं पहिलं आव्हान असेल… नवी जबाबदारी मिळणं काही नवीन नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी १० जून रोजी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले.

पक्षाच्या कार्यक्रमानंतर प्रफुल पटेल हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी नवी जबाबदारी आणि पक्षासमोर असलेली नवी आव्हाने यावर आपली मते मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, मला अशी जबाबदारी मिळणं काही नवीन नाही. मी खूप वर्षांपासून पवार साहेबांबरोबर राष्ट्रीय पातळीवर काम करतोय. पक्षाने आजवर जी जबाबदारी दिली ती मी पार पाडत आलो आहे. माझ्यासाठी आता पदोन्नती काही नवीन गोष्ट नाही.

प्रफुल्ल पटेल यांना यावेळी पक्षाचा पुढील आव्हानांविषयी विचारण्यात आलं. त्यावर पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं हे आमचं पहिलं आव्हान असेल.खरंतर ही सर्वच नेत्यांची जबाबदारी असेल. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. अशा आणखी दोन तीन राज्यांमध्ये आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं आणि मतांची टक्केवारी वाढवणं आणणं हे आमचं प्रमुख आव्हान असेल. त्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागेल.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळल्यानंतर ती परत रद्द केली जाणं ही आम्हाला शोभणारी गोष्ट नाही. आम्हालाही याचं दुःख आहे. परंतु ठीक आहे, राजकारण म्हटलं की, उतार चढाव होत असतात. आज उतार असेल पण परत चढावही दिसेल, प्रगतीचे दिवस दिसणार आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *