Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अजित पवार… पक्षाचे नेते, तर अजित दादा म्हणाले, नो कॉमेंटस.. अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर जाण्याच्या मुद्यावरून शरद पवार यांचे स्पष्ट मत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खरा वारसदार सुप्रिया सुळे की अजित पवार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संदोपसंदी सुरु झालेली असतानाच अजित पवार यांनी आपल्या काही समर्थकांना सोबत घेत भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा सुरु झाली. मात्र आज शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यात असताना तराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नसल्याचे जाहिर करत अजित पवार हे पक्षाचे आमच्या पक्षाचे नेते असल्याचे सांगत एखाद्याला चूक केल्यानंतर एकदाच संधी द्यायची असते दुसऱ्यांदा मात्र संधी द्यायची नसते असे सांगत अजित पवार यांच्या घरवापसीवरून आपली भूमिका मांडली.

शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्यामुळे अजित पवार पुन्हा माघारी फिरणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे.
नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यात बोलताना अजित पवार आमचे नेते असून पक्षात फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केले. त्यासंदर्भात बारामतीमध्ये शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता शरद पवारांनी त्या वक्तव्याचं समर्थन करताना पक्षात फूट पडली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला.

शरद पवारांनीही अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं मान्य केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं. २०१९प्रमाणे अजित पवार पुन्हा माघारी येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. त्यासंदर्भात साताऱ्याच्या दहिवाडीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांना पुन्हा विचारणा केली असता त्यांनी हे विधान फेटाळतानाच अजित पवारांना पुन्हा संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

एकदा-दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती सरळ केली असेल तर सुधारणा करण्याची एक संधी द्यावी अशी भूमिका पक्षानं यापूर्वी घेतली. तुम्हाला आठवत असेल, एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही, आमच्याकडून चुकीची गोष्ट घडली, पुन्हा अशा रस्त्याने जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी म्हणून वेगळा निर्णय घेतला होता, असंही शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा असं होणार नाही हे ठरल्याचं शरद पावर यांनी सांगत संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका मांडली आहे. संधी वारंवार मागायची नसते, आणि मागितली तरी ती द्यायची नसते. आमची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले.

तर दुसऱ्याबाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर देत मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून मला राज्यात सुरु असलेल्या विकासकामांबाबत विचारा असे सांगत शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलण्याचे टाळले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *