Breaking News

रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ ९ तारखेपासून वाढीव वेळेत सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने गेली काही महिने आर्थिक बाजारातील व्यापारावर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. परंतु आता लॉकडॉऊनमध्ये शिथिलता आणत सर्वच गोष्टी पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर आर्थिक बाजारातील व्यापारावर असलेली वेळेची मर्यादेत पुन्हा वाढ कऱण्याचा निर्णय घेण्यात आला असून या वाढीव वेळेची अंमलबजावणी ९ नोव्हेंबर २०२० रोजीपासून करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आले.
यामध्ये कॉल-नोटीस-टर्म मनी व्यापाराचा सध्याचा कालवधी सकाळी १० ते २ आहे. मात्र त्यात १.३० तासाने वाढ करण्यात आली असून हा व्यापार सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत सुरु राहणार आहे.
मार्केट रेपो इन गर्व्हमेंट सिक्युरिटीज सकाळी १० ते दुपारी २.३० पर्यंत सुरु राहणार.
ट्राय पार्टी रेपो इन गर्व्हमेंट सिक्युरिटीज सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार.
कर्मशिअल पेपर अँण्ड सर्टिफिकेट ऑफ डिपोझिट सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
रेपो इन कोर्पोरेट बॉण्डस् सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
गर्व्हमेंट सिक्युरिटीज ( सेंट्रल गर्व्हमेंट सिक्युरिटीज, स्टेट डेव्हलपमेंट लोनस् आणि ट्रेझरी बिल्स) सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
फॉरेन करन्सी-इंडियन रूपी सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
रूपी इंटरेस्ट रेट सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.

Check Also

केंद्रीय अर्थसंकल्पात कर कपातीमुळे या वस्तू स्वस्त तर त्या होणार महाग अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली घोषणा

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *