Breaking News

नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती, ही आहे पात्रता आणि प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरा आणि जाणून घ्या

नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्ड (NABARD) ने ग्रामीण विकास बँकिंग सेवा (RDBS) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक ‘ग्रेड A’ या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात.

परीक्षा कधी

असिस्टंट मॅनेजर पदांसाठीच्या या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. लेखी परीक्षा दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्याची लेखी परीक्षा १६ ऑक्टोबर २०२३ रोजी घेतली जाणार आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय ०१ सप्टेंबर २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत लागू आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी उमेदवाराने प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

अर्ज फी

SC/ST आणि PWBD प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर सर्व श्रेणींसाठी ८०० रुपये भरावे लागतील. नाबार्डच्या विद्यमान कर्मचाऱ्यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

– सर्वप्रथम nabard.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

– मुख्यपृष्ठावरील ‘करिअर नोटिस’ वर क्लिक करा आणि पुढे जा.

– ‘ग्रेड ‘A’ – 2023 मध्ये असिस्टंट मॅनेजर (RDBS) च्या पदासाठी भर्ती’ अंतर्गत अर्ज लिंकवर क्लिक करा.

– IBPS पोर्टलवर नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.

– कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि सबमिट करा.

– डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

Check Also

मार्च अखेर किरकोळ बाजारातील महागाई दर ४.८५ टक्के ग्राहक किंमत निर्देशांकात महागाई अद्यापही चढ्या क्रमानेच

२०२४ साठी किरकोळ बाजारातील महागाई दर ४% च्या वर राहिली आणि ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *