Breaking News

मलाही कमी वेळेत श्रीमंत व्हायचेय? गुंतवणूकीचे हे ५ पर्याय उपयुक्त ठरतील गुंतवणूकीच्या या आहेत टीप्स

अनेक गुंतवणूकदार विचार न करता गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना नंतर अनेक वेळा पश्चात्ताप होतो. जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतात. येथे तुम्हाला असे पर्याय सांगितले जात आहेत ज्यात हुशारीने गुंतवणूक केली तर तुम्हा चांगला परतावा मिळू शकतो. तसेच पैशांची गरज भासल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

बँक एफडी

तुम्ही बँक एफडीमध्ये ७ दिवसांपासून ते १ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही ५ किंवा १० वर्षांसाठी देखील एफडी करू शकता. तुम्हाला जोखीम मुक्त परतावा मिळवायचा असेल तर १ वर्षाच्या एपडीवर ३.४० टक्के ते ५.७५ टक्केव्याज मिळू शकते.

कंपनी एफडी

अनेक कंपन्या त्यांच्या व्यवसायासाठी बाजारातून पैसे गोळा करतात. यासाठी कंपनी एफडी जारी करते. कंपनी एफडीवर बँकेपेक्षा जास्त परतावा देते. तथापि, गुंतवणूक करण्यापूर्वी रेटिंग एजन्सीने दिलेल्या रेटिंगच्या आधारे गुंतवणूक करता येते. आयसीआयसीआय होम फायनान्स एफडीवर ७ टक्के आणि मणिपाल हाउसिंग फायनान्स एफडीवर ८.२५ टक्के व्याज मिळत आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट

तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. एक वर्षाची पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी ६.९ टक्के व्याज दर देत आहे. व्याज दरवर्षी दिले जाते. परंतु त्रैमासिक गणना केली जाते.

आवर्ती ठेव (RD)

तुम्ही आरडीमध्ये ६,९ किंवा १२ महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. आरडीमध्ये ठेवीचा किमान कालावधी सहा महिन्यांचा आहे. आरडीवर ६.७५ टक्के ते ७.२५ टक्के दराने व्याज उपलब्ध आहे.

डेट म्युच्युअल फंड
तुम्ही कमी कालावधीसाठी डेट म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता. तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त १२ महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला सरासरी ६ टक्के ते ७ टक्के परतावा मिळेल.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *