Breaking News

अखेर ‘या’ कारणामुळे रिझर्व्ह बँकेने घेतल्या २ हजारच्या नोटा चलनातून मागे मार्च २०२३ अखेर फक्त १० टक्के नोटा चलनीय बाजारातः ३० सप्टेंबर अखेरपर्यंत बँकेत कराव्या लागणार जमा

२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे कंबरडे मोडायचे असल्याचे सांगत अचानकच देशातील एक हजार, ५०० रूपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे संबध देशवासियांकडे असलेल्या ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा कागदाचे गोळे ठरले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन हजार रूपयांची आणि पाचशे रूपयांची नवी नोट जारी करत त्या नोटा चलनात आणल्या. मात्र मागील तीन वर्षात चलनातून दोन हजार रूपयांच्या नोटा कमी कमी होत असल्याने अखेर दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज शुक्रवारी निर्णय घेतला. तसेच या नोटा बँकामध्ये परत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आली.

२३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहे. २० हजार रुपये म्हणजेच एका वेळी १० नोटा जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु २ हजार रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. गेल्या काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.

मागील चार-पाच वर्षात दोन हजार नोटांचा वापर बाजारातून कमी झालेला आहे. २०१७ साली २००० च्या नोटा ८९ टक्के बाजारात होत्या. तर २०१८ साली हा नोटांची ३७.३ टक्के (६.७३ लाख कोटी रूपये) इतक्या चलनात राहिल्या. तर ३१ मार्च २०२३ अखेर भारतीय बाजारत ही संख्येत आणखी घट होऊन १०.८ टक्के (३.६२ लाख कोटी) इतक्या नोटाच चलनात असल्याचे आढळून आले. त्यामुळे या नोटा २३ मे २०२३ मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असून ३० सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत नागरिकांना दिली. तसेच एका वेळी फक्त २ हजाराच्या १० नोटाच अर्थात २० हजार रूपये बदलून मिळणार आहेत.

फर्जी वेब सीरीज हे ही एक कारण?
नुकतेच अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर फर्जी ही वेब सीरीज नुकतीच रिलीज झाली. या वेब सीरीजमध्ये २ हजार आणि ५०० रूपयांची नोट बनावट पध्दतीने बनविण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच वेब सीरीजच्या दिग्दर्शकाने बनावट नोट बनविताना दोन हजार रूपयांच्या नोटेतील बरेच बारीक-सारीक डिटेल्सही दर्शकांपर्यंत पोहोचवले आहेत. तसेच बनावट नोट तयार करताना त्याचे ड्रॉईंग टेक्निकही अप्रत्यक्ष जाहिर केले. त्यामुळे तर २००० रूपयांच्या नोटा बाजारातून मागे घेतल्या नाहीत ना अशी शंका नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

गुंतवणूकदारांसाठी खुषखबरः या कंपन्यांचे आयपीओ बाजारात ७-८ कंपन्यांचे म्युच्युअल फंड बाजारात

म्युच्युअल फंड हाऊसेसने गेल्या तीन वर्षांत दर महिन्याला १०-१२ इक्विटी नवीन फंड ऑफर (NFOs) सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *