Breaking News

या डिसेंबर महिन्यात ‘ही’ चार कामे करणे अत्यावश्यक, अन्यथा पडेल भुर्दंड आयकर रिटर्न, वारस जोडणे, गृहकर्ज यासह चार गोष्टी कऱणे आवश्यक

मराठी ई-बातम्या टीम
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे. तुम्ही अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल, तर ते ३१ डिसेंबरपर्यंत भरा. त्याच वेळी, ईपीएफओने पीएफ खातेधारकांना या महिन्याच्या अखेरीस नॉमिनी जोडण्यास सांगितले आहे. आम्ही तुम्हाला अशा ४ गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला या महिन्यात करायच्या आहेत.
आयकर रिटर्न
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ३१ डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर वेळेवर दाखल केल्याने तुम्ही केवळ दंडापासूनच वाचत नाही तर इतरही अनेक फायदे आहेत. वेळेवर आयटीआर न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. याशिवाय नोटीस येण्याची भीती असेल. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस पुरावा सादर केलेला असतो.
नॉमिनी जोडणे
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सर्व पीएफ खातेधारकांना नॉमिनी जोडण्यास सांगितले आहे. EPFO ने नॉमिनी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात नॉमिनी जोडला नाही तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ईपीएफओच्या साइटवर जाऊन हे काम ऑनलाइन करता येईल. नॉमिनी जोडल्याने EPF सदस्याचा मृत्यू झाल्यास PF पैसे, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना (EDLI) चे लाभ नॉमिनीला सहज मिळण्यास मदत होते.
गृहकर्जासाठी अर्ज
बँक ऑफ बडोदाने सणासुदीसाठी गृहकर्जाचा व्याजदर ६.५०% पर्यंत कमी केला आहे. नवीन कर्जाव्यतिरिक्त, नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावर देखील मिळेल. या ऑफरचा लाभ ३१ डिसेंबरपर्यंत मिळणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
लेखापरीक्षण अहवाल
ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न १० कोटींपेक्षा जास्त आहे अशा व्यवसायाशी संबंधित लोकांना आयकर रिटर्नसह ऑडिट रिपोर्ट दाखल करावा लागेल. वास्तुविशारद, अभियंता, डॉक्टर, चित्रपट अभिनेते, वकील, तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना केवळ ५० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावरच लेखापरीक्षण अहवाल दाखल करावा लागतो. आर्थिक वर्ष २०२०-२१ चे ऑडिट दाखल करण्याची अंतिम मुदत देखील ३१ डिसेंबर आहे.

Check Also

बोर्नव्हिटासह सर्व पेये आणि खाद्य पेये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काढून टाका

देशात एकाबाजूला आगामी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी वाजत असताना दुसऱ्या बाजूला मात्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *