Breaking News

ई-फायलिंग पोर्टलद्वारे भरा आयटी रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया आयकर रिटर्न भरण्याची तारीख आली जवळ

मुंबई: प्रतिनिधी

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरू शकता. आयकर रिटर्न ऑनलाइन भरू शकता. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे आयकर विवरणपत्र भरू शकता.

२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १.७६ कोटीहून अधिक करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलद्वारे त्यांचे ITR भरले आहे. काही अतिशय सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही तुमचे आयकर रिटर्न इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे भरू शकता. या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ या.

तुमचे आयकर रिटर्न भरण्यासाठी, प्रथम तुम्हाला आयकर ई-फायलिंग पोर्टल Incometax.gov.in ला भेट द्यावी लागेल. तुम्हाला पोर्टलवरील ‘Login’ बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचे ‘username’ टाकावे लागेल. नंतर continue’ वर क्लिक करा आणि तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा. यानंतर तुम्हाला ‘e-file’ टॅबवर क्लिक करावे लागेल आणि ‘File Income Tax Return’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला ‘असेसमेंट इयर २०२१-२२’ चा पर्याय निवडावा लागेल आणि ‘continue’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर ‘ऑनलाइन’ किंवा ‘ऑफलाइन’ पर्याय दिसेल. तुम्हाला ‘ऑनलाइन’ पर्यायावर क्लिक करून पुढे जावे लागेल.

यानंतर तुम्हाला दिलेल्या individual, Hindu Undivided Family (HUF) or others या पर्यायांमधून ‘individual’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला ‘Continue’ टॅबवर क्लिक करावे लागेल. या टप्प्यानंतर तुम्हाला ITR-1 किंवा ITR-4 पर्याय निवडावा लागेल आणि ‘Proceed’ टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढील टप्प्यात तुम्हाला मूळ सूट मर्यादेच्या वर किंवा कलम १३९(१) अंतर्गत सातव्या तरतुदीनुसार तुमचे विवरणपत्र भरण्याचे कारण विचारले जाईल. तुमचा आयटीआर ऑनलाइन भरताना तुम्ही योग्य पर्याय निवडला आहे, याची तुम्हाला खात्री करावी लागेल.

तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमचे रिटर्न भरले, पण जर कर जमा केला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. तोही दर महिन्याला पूर्ण १ टक्के आधारावर असेल. हा दंड केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा तुमच्यावरील आयकर दायित्व १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.

आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी अनेक आयटीआर फॉर्म तयार केले आहेत. उत्पन्नाच्या स्रोतावर आधारित ITR फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला आयकर कलम 139 (5) अंतर्गत सुधारित विवरणपत्र दाखल करण्यास सांगितले जाईल. ज्यांचे वार्षिक वेतन, मालमत्ता भाडे आणि इतर स्रोतांमधून ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आहे ते ITR-1 सहज फॉर्म भरू शकतात. त्याच वेळी, यापेक्षा जास्त कमावणाऱ्यांना ITR-2 फॉर्म भरावा लागतो.

Check Also

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *